दिंडोरी तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचारवरखेडा : दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी, कंरजी, हातनोरे, कंरजवण आदि गावांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार व वावर वाढला आहे. अनेक पाळीव प्राणी, शेळ्या मेंढ्या, वासरे यांचा फडशा पाडला असतानाही वन विभागाच्या वतीने मात्र नागरिकांच्या संरक्षणार्थ कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नसल्याची तक्र ार नागरिकांकडून होत आहे.दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी, कंरजी, हातनोरे, कंरजवण परिसरात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. पाळीव प्राण्यांसह कुत्र्यांचा फडशा पाडला जात आहे. हल्ला होऊ शकतो या भीतीने ज्या-ज्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे तेथील नागरिक धास्तावले आहेत. मात्र संबंधित वन विभागाच्या वतीने ठोस असे उपाय केले जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. परमोरी परिसरातील गोविंद रंगनाथ दिघे यांच्या उसाच्या शेतात दोन दिवसांपूर्वी बिबट्या दिसला होता. वन विभागाच्या वतीने प्रत्यक्ष पाहणी करून बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. मनुष्यावर हल्ला झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्यात अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
दिंडोरी तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार
By admin | Published: January 10, 2016 10:30 PM