मंगळवारी शेतमाल लिलाव पूर्ववत झाले त्यावेळी पोलीस व राज्य राखीव दलाच्या जवानांनी तळ ठोकला होता. कोरोना तपासणी अहवाल पाहूनच कांदा शेतमालाच्या वाहनासह मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जात होता. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांकडे कोरोना चाचणीचा अहवाल नव्हता त्यांच्यासाठी खासगी लॅबद्वारे कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यवस्था केली होती, तर खासगी लॅबकडून शेतकऱ्यांकडून चारशे रुपये आकारणी केली जात होती. त्यामुळे प्रहार शेतकरी संघटनेचे गणेश निंबाळकर, रेवन गांगुर्डे, विलास भवर, शिवसेनेचे गणेश ठाकरे आदींनी कोरोना चाचणी ही कृषी उत्पन्न बाजार समितीने करावी व शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे परत करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, सचिव गोरखनाथ गांगुर्डे यांच्याकडे केली. यावेळी बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सचिव तसेच सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक पी.एस. पाटोळे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या उपस्थितीत शेतकरी व प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी बाजार समिती संचालक मंडळ व व्यापारी यांच्यात संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेने काही काळ वातावरण तापले होते.
इन्फो
१७७ वाहनांतून कांदा आवक
आवारात सकाळपासून ८६ जीप, ९१ टॅक्टर अशी एकूण १७७ वाहने कांदा लिलावासाठी आली होती. उन्हाळ कांदा कमीत कमी भाव एक हजार, तर जास्तीत जास्त १७३० रुपये भाव जाहीर झाला. उन्हाळ कांदा गोल्टी सहाशे रुपये, तर जास्तीत जास्त भाव १३६६ रुपये होता. बाजार समितीच्या वतीने आवारात सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्यात आली. मास्क सक्तीचे केल्याने कांदा लिलाव सुरळीत पार पडल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले
फोटो- २५ चांदवड ओनियन
चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावासाठी आलेली वाहने.
===Photopath===
250521\25nsk_32_25052021_13.jpg
===Caption===
फोटो- २५ चांदवड ओनियन चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावासाठी आलेली वाहने.