शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

गरीब कल्याण योजनेंतर्गत वरखेड्यात मोफत धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 3:53 PM

वरखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या मोफत तांदूळ व गहू वाटप योजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून वरखेडा येथील स्वस्त धान्य दुकानात कोविड संदर्भात सर्व नियमांचे पालन करीत धान्य वाटप करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊन केले

वरखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या मोफत तांदूळ व गहू वाटप योजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून वरखेडा येथील स्वस्त धान्य दुकानात कोविड संदर्भात सर्व नियमांचे पालन करीत धान्य वाटप करण्यात येत आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही नागरिक उपाशी राहू नये यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत दरमाह पाच किलो याप्रमाणे प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना मोफत तांदूळ, गहू देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी या योजनेचा शुभारंभ झाला असून नागरिकांना शासनाचे सर्व नियम पाळून धान्य वाटप करण्यात येत आहे.गतवर्षीच्या लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या केसरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात आला होता. या योजनेअंतर्गत पुन्हा जूनमध्ये अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याचबरोबर आता एपीएल केसरी शिधापत्रिकाधारकांनाही जून महिन्यात प्रत्येकास एक किलो गहू व एक किलो तांदूळ याप्रमाणे दोन किलो अन्नधान्य सवलतीच्या दरात वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक