नाशिक : पन्नास वर्षे पूर्ण करणाºया बालभारतीचे नाव बदलणार नाही. तसेच बदलत्या काळानुसार ई-बालभारती करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. इतकेच नव्हे तर राज्यभरातील १ लाख ६ हजार शाळांमध्ये मोफत ई-लर्निंगची व्यवस्था करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोेद तावडे यांनी केली. नाशिक येथील गुरूगोविंद सिंग महाविद्यालयात बालभारतीच्या सुवर्णमहोत्सवाची सांगता व अंबड येथील नवीन इमारतीचे उद्घाटन डिजिटल तंत्रज्ञानाने विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बालभारतीचे संचालक सुनील मगर, आमदार सीमा हिरे, जयंत जाधव, गुरू गोविंद सिंग महाविद्यालयाचे गुरूदेवसिंग बिरदी, बालभारतीच्या सुजाता काळभोर आदी उपस्थित होते. विनोद तावडे यांनी सांगितले की, बदलत्या काळानुसार बालभारतीने बदल आत्मसात केले आहे. पन्नास वर्षांच्या वाटचालीत बालभारतीने अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल केले. विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या जडणघडणीत बालभारतीचा मोठा वाटा आहे. आता बालभारतीच्या पुस्तकातील कविता व गणिते शब्दाचा आशय व खोली ठेवून गाण्यांच्या स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न गायक स्वप्नील बांदोडकर यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयोेग सुरू केला आहे. १९८० सालीच जगभर स्वीकारण्यात आलेली ज्ञानरचनेवर आधारित अभ्यासक्रम बालभारतीने तयार करण्याच्या सूचना बालभारतीचे अध्यक्ष म्हणून आपण दिल्या आहेत. एका उद्योेजकाने राज्यभरातील १ लाख ६ हजार शाळा मोफत डिजिटल करण्याची तयारी दर्शविली असून, पुढील वर्षापासून पहिली ते दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम ई-लर्निंगवर आधारित राबविण्यास प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणार असल्याची घोषणा यावेळी विनोद तावडे यांनी केली. प्रास्ताविकात सुनील मगर यांनी बालभारतीच्या पन्नास वर्षांतील वाटचालीचा आढावा सादर केला तर उपस्थितांचे आभार विवेक गोसावी यांनी मानले. वेतनवाढीची घोषणा बालभारतीच्या वाटचालीत महत्त्वाचे योगदान देणाºया सेवानिवृत्त व विद्यमान कर्मचाºयांना बक्षीस यावेळी विनोद तावडे यांनी जाहीर केले. विद्यमान कर्मचारी व अधिकारी यांना एका महिन्याची वेतनवाढ तर सेवानिवृत्तांना दहा हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली.
दहावीपर्यंत मोफत ई-लर्निंग ; विनोद तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 1:13 AM