कोरोनाच्या संकटामुळे मनुष्य आपल्या आरोग्याबाबत सजग झालेला दिसून येतो; मात्र उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा आजही आपल्याकडे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे, हे विसरून चालणार नाही. यामुळेच सर्वसामान्य महिलांना त्यांचे आरोग्य उत्तमरीत्या राखता यावे आणि त्यांच्यामध्ये आपल्या आरोग्याविषयी जागरूकता यावी, या उद्देशाने रेडक्रॉसकडून स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सुषमा भुतडा यांच्या पुढाकाराने मोफत स्त्री रोग तपासणी कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. गरजू महिलांनी या कक्षाला भेट देऊन आपल्या आरोग्याच्या तक्रारींचे निवारण करून वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेत योग्य तो औषधोपचार सुरू करून पुढील धोका टाळावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा औंधकर यांनी केले आहे, दर बुधवारी सकाळी १० वाजेपासून टिळक पथ येथील रेडक्रॉस दवाखान्यात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी केली जाईल.
‘रेड क्रॉस’मध्ये मोफत स्त्री रुग्ण तपासणी कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:14 AM