सटाणा : येथील पालिकेतर्फेशहरातील अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी मोफत लाकूड देण्यास सुरु वात झाली आहे. या लोकोपयोगी उपक्रमाचे स्वागत होत आहे.नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी अंत्यविधी प्रसंगी मोफत लाकूड देण्याचे आश्वासन दिले होते. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयाला सर्वानुमते मंजुरी देतानाच यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली. त्यानुसार १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या उपक्रमास प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत शहरातील अमरधाम व वैकुंठधाम या दोन्ही अंत्यविधीच्या ठिकाणी पालिकेतर्फे अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड मोफत पुरविण्यात येत आहे. यासाठी अरूण बच्छाव हे पुरवठादार नियुक्त करण्यात आले आहेत, तर समन्वयक म्हणून रमेश धोंडगे, योगेश अहिरराव व हेमंत अहिरे काम पाहतात. विशेष बाब म्हणजे अशा स्वरूपाच्या उपक्रमाची प्रत्यक्ष अंमल बजावणी करणारी सटाणा ही जिल्ह्यातील पहिलीच पालिका आहे. नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष सोनाली बैताडे, गटनेते राकेश खैरनार, महेश देवरे, काका सोनवणे, दिनकर सोनवणे, सभापती दीपक पाकळे, राहुल पाटील, संगीता देवरे, शमा मन्सुरी, उपसभापती सुवर्णा नंदाळे, नगरसेवक बाळू बागुल, सुनिता मोरकर, पुष्पा सूर्यवंशी, मुन्ना शेख, निर्मला भदाणे, आशा भामरे, रूपाली सोनवणे आदींनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.
सटाण्यात अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:01 PM