कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाऊनमुळे बऱ्याच हातावर पोट भरणाऱ्या लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तसेच घरातील कर्त्याधर्त्या महिला अथवा पुरुषास जर कोरोनाची लागण होऊन तो अथवा ती हॉस्पिटलमध्ये दाखल असेल किंवा विलगीकरणात घरी, कोविड सेंटरला भरती असेल तर त्या संपूर्ण कुटुंबाची जेवणाची आबाळ होते. ही गरज ओळखून हा मोफत भोजन सेवेचा उपक्रम हाती घेण्यात आला. कोरोनाचे संकट आणि या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घातलेले कठोर निर्बंध यामुळे हातावर पोट भरणार्या गरजू लोकांची जेवणाची गैरसोय दूर करण्यासाठी मोफत भोजन सेवा केंद्र सुरू करण्यात येत असल्याचे राहुल चोथवे यांनी सांगितले. येथील तानाजी चौकात एचडीएफसी बँकेसमोरील विमल बंगला येथे पार्सल सुविधेकरिता भोजन सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे.
इन्फो
लॉकडाऊन असेपर्यंत सेवा
लॉकडाऊन सुरू असेपर्यंत हा सेवेचा उपक्रम सुरु ठेवण्याचा मानस असल्याचे आयोजकांनी सांगितले. पहिल्या दिवशी २२० लाभार्थ्यांनी यात उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथील काही रुग्ण, नातलग, कर्मचारी तसेच सुविधा केंद्रावर अनेक गरजवंतांनी याचा लाभ घेतला. दररोज सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत गरजूंना केवळ पार्सलद्वारे भोजन सेवा देण्यात येणार आहे.
फोटो - २४ सिन्नर अन्नदान
सिन्नर येथे कै. गंगाधर चोथवे चॅरिटेबल ट्रस्ट, साईबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था व विमल वस्त्र भांडार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भोजन सेवा उपक्रम राबविण्यास प्रारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी राहुल चोथवे, महेंद्र तारगे, ज्ञानेश्वर तांबे व संस्थेचे पदाधिकारी.
===Photopath===
240421\24nsk_31_24042021_13.jpg
===Caption===
फोटो - २४ सिन्नर अन्नदान सिन्नर येथे कै. गंगाधर चोथवे चॅरिटेबल ट्रस्ट, साईबाबा ग्रामीण बिगतशेती सहकारी पतसंस्था व विमल वस्त्र भांडार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भोजन सेवा उपक्रम राबविण्यास प्रारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी राहुल चोथवे, महेंद्र तारगे, ज्ञानेश्वर तांबे व संस्थेचे पदाधिकारी.