जायखेडा : मुल्हेर ता.बागलाण येथे अनुगामी लोकराज्य महाअभियान संस्थेच्या माध्यमातून उज्ज्वला योजने अंतर्गत गावातील आदीवासी बांधवाना मोफत गॅस साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच मोठाभाऊ जगताप हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीचे उपसभापती किशोर भापकर, ग्रामपंचायत सदस्या सोनाली भापकर, अनुलोम चे बागलाण तालुका प्रमुख संजय गोसावी, अनुलोम च्या संचालिका मायाताई येवला, सामिजक कार्यकर्ते विकास बत्तीसे हे उपस्थित होते.गरजू व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील वंचित घटकांच्या विकासासाठी व शासनाच्या योजना त्यांच्या पर्यंत पोहचवण्याच्या उद्देश्याने अनुलोम हि संस्था कार्य करीत असून उज्ज्वला योजनेची माहिती व त्यासाठी आवश्यक कागतपत्र या संदर्भात माया येवला यांनी माहिती दिली. तसेच शासनाच्या विविध योजना ह्या गरजू लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य आम्ही करून वंचितांना त्याचा लाभ नक्की देऊ अशी ग्वाही उपसरपंच मोठाभाऊ जगताप यांनी दिली. यावेळी विकास बत्तीसे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गावातील आदिवासी बांधवाना गॅस सिलेंडर, शेगडी, व सर्व किट मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्र मास ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.(फोटो २० गॅस)मुल्हेर येथे गॅस साहित्य वाटत करताना मान्यवर व लाभार्थी.
मुल्हेर येथे अनुलोम च्या सहकार्याने उज्ज्वला योजने अंतर्गत मोफत गॅस वितरणजायखेडा : मुल्हेर ता.बागलाण येथे अनुगामी लोकराज्य महाअभियान संस्थेच्या माध्यमातून उज्ज्वला योजने अंतर्गत गावातील आदीवासी बांधवाना मोफत गॅस साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच मोठाभाऊ जगताप हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीचे उपसभापती किशोर भापकर, ग्रामपंचायत सदस्या सोनाली भापकर, अनुलोम चे बागलाण तालुका प्रमुख संजय गोसावी, अनुलोम च्या संचालिका मायाताई येवला, सामिजक कार्यकर्ते विकास बत्तीसे हे उपस्थित होते.गरजू व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील वंचित घटकांच्या विकासासाठी व शासनाच्या योजना त्यांच्या पर्यंत पोहचवण्याच्या उद्देश्याने अनुलोम हि संस्था कार्य करीत असून उज्ज्वला योजनेची माहिती व त्यासाठी आवश्यक कागतपत्र या संदर्भात माया येवला यांनी माहिती दिली. तसेच शासनाच्या विविध योजना ह्या गरजू लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य आम्ही करून वंचितांना त्याचा लाभ नक्की देऊ अशी ग्वाही उपसरपंच मोठाभाऊ जगताप यांनी दिली. यावेळी विकास बत्तीसे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गावातील आदिवासी बांधवाना गॅस सिलेंडर, शेगडी, व सर्व किट मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्र मास ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.