जायखेडा : मोसम खोºयात बिबट्याचा ठिकठिकाणी मुक्त संचार वाढळत असून, पाळीव प्राण्यांवर हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी नामपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या व एक गोºहा ठार झाल्याची घटना ताजी असतानाच जायखेडा येथे सोमवारी (दि. १३) रात्री बिबट्याने हल्ला करून गाईला ठार केले.रविवारी मध्यरात्री बिबट्याने एकलहरे शिवारातील मोतीराम नामदेव शेवाळे यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या गाईवर हल्ला करून तिला ठार केले. या घटनेमुळे शेतात वस्तीवर राहणाºया शेतकरी व पशुपालकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.शेवाळे यांनी आपल्या शेतात गाय-वासरांसाठी छोटीशी खोली बनवली असून, यात ते आपली गुरं बांधतात. बिबट्याने सोमवारी मध्यरात्री या ठिकाणी बांधलेल्या गाईला ठार मारले. सकाळी मोतीराम शेवाळे हे शेतात गेले असता ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर ताहाराबाद येथील वनविभागाला कळविण्यात आले, वनविभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणीमोसम खोºयातील जायखेडा, पाडगण, लाडूद, एकलहरे, वाडी पिसोळ तसेच सोमपूर, नामपूर परिसरात बिबट्यांचा नेहमीच वावर असतो. शेतात बांधलेल्या पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनाही नेहमीच घडत असतात. यापासून बचावासाठी अनेक शेतकºयांनी छोटे-मोठे गोठे बनविले आहेत. तरीही गोठ्यात घुसून जनावरे बिबट्या फस्त करत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी येथून जवळच असलेल्या तळवाडे भामेर येथे बिबट्याने एका बालकाला त्याच्या आईवडिलांच्या जवळून उचलून नेऊन ठार केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोसम खोºयात बिबट्याचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:10 AM
जायखेडा : मोसम खोºयात बिबट्याचा ठिकठिकाणी मुक्त संचार वाढळत असून, पाळीव प्राण्यांवर हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी नामपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या व एक गोºहा ठार झाल्याची घटना ताजी असतानाच जायखेडा येथे सोमवारी (दि. १३) रात्री बिबट्याने हल्ला करून गाईला ठार केले.
ठळक मुद्देमोसम खोºयात बिबट्याचा ठिकठिकाणी मुक्त संचार शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण