शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
3
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
4
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसे मिळवायचं
5
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
6
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
7
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
9
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
10
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
11
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
12
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
13
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
14
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
15
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
16
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
17
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
19
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?

मांजरपाड्याचा मार्ग मोकळा

By admin | Published: March 23, 2017 1:31 AM

येवला : आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे मांजरपाडा प्रकल्पाच्या शिल्लक निधी खर्चास शासनाने मंजुरी दिली असून,बंद पडलेले काम आता सुरु होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

येवला : आमदार छगन भुजबळ  यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे मांजरपाडा प्रकल्पाच्या शिल्लक निधी खर्चास शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून, या प्रकल्पाचे बंद पडलेले काम आता तातडीने सुरु होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  सद्यस्थितीत मांजरपाडा योजनेत ८.९६ किमी लांबीच्या बोगद्यापैकी ८६ टक्के, तर धरण आणि सांडव्याचे ६० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. पश्चिमवाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे अडवून हे पाणी बोगद्याद्वारे गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार असल्यामुळे या योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता किंवा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात येऊन या योजनेचे काम सुरु करावे, अशी आमदार छगन भुजबळ यांच्यासह स्थानिक संघर्ष समितीने केली होती. या महत्वकांक्षी वळण योजनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील गुजरातच्या हद्दीवरील पाणलोट क्षेत्रातील पश्चिमवाहिनी नद्यांचे गुजरातकडे आणि अरबी समुद्रात वाहून जाणारे ८४५ दलघफु पाणी आडवुन हे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार आहे. यातील १०० दलघफु पाणी स्थानिक वापरसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. मागील वर्षी शासनाने ७० कोटींपैकी सुमारे ४०कोटी निधी राज्यातील दुसऱ्या प्रकल्पांसाठी वर्ग केला होता. सध्यस्थितित या प्रकल्पसाठी ३३ कोटी निधि शिल्लक असुन १८ मार्च रोजी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात उर्ध्व गोदावरीसाठी ३८.३५ कोटी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. मागील अर्थसंकल्पिय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देतांना या योजनेचे काम तातडीने सुरु केले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी आमदार भुजबळ यांना आश्वासन दिले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या प्रकल्पस्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी सुद्धा केली आहे. केवळ बोगद्याचे काम जरी पूर्ण झाले तरी गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार असल्यामुळे या योजनेसाठी भुजबळांचा पाठपुरावा सुरु होता. याबाबत भुजबळ यांनी यापूर्वी आर्थर रोड कारागृहामधुन मुख्यमंत्र्यांना स्वहस्ताक्षरात पत्रसुद्धा लिहिले होते. आता राज्य शासनाने शिल्लक असलेल्या ३३ कोटी रु पयांच्या निधी खर्चास मंजुरी दिल्यामुळे लवकरच मांजरपाडा प्रकल्पाचे काम सुरु होण्याची अशा आहे. येवला तलुक्यासह दिंडोरी, निफाड  आणि चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पामुळे लाभ होणार आहे. (वार्ताहर)