मांगीतुंगी येथील १०८ फ़ुट भगवान ऋषभदेवांच्या मूर्तीकडे जाण्यासाठी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करतांना पीठाधीश रवीन्द्रकीर्ति स्वामीजी ,अनिल जैन,संजय पापडीवाल,प्रमोद कासलीवाल,भूषण कासलीवाल ,इंजी. सी. आर. पाटील ,प्रतिष्ठाचार्य विजय जैन व जायखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड व कर्मचारी़
सटाणा : बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी पर्वतावर अखंड पाषाणात कोरण्यात आलेल्या देशातील सर्वाधिक १०८ फुट उंच भगवान ऋषभदेव यांच्या महाकाय मूर्तीकडे जाण्यासाठी शासनाकडून २ .७३ हेक्टर वन जमीन मुर्तीनिर्माण समितीला प्रदान करण्यात आली आहे. तसे आदेश वन विभागाला प्राप्त झाल्यानंतर आज मंगळवारी (दि.२०) हा रस्ता भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. या जमिनीमुळे या तीर्थक्षेत्र विकासाबरोबरच परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.फेब्रुवारी २०१६ मध्ये महामस्तकाभिषक सोहळा साजरा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली . या सोहळ्यास देशभरातून चाळीस लाखाहून अधिकभाविकांनी हजेरी लावली होती. दरम्यान पर्वतावर थेट वाहनाने जाण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने हा मार्ग बंद करण्यात आल्याने भाविकांचे हाल झाले होते. भाविकांना सुलभ पद्धतीने दर्शन व्हावे म्हणून पीठाधीश स्वामी रवींद्रकीर्ती महाराज , महामंत्री पन्नालाल पापडीवाल , अध्यक्ष संजय पापडीवाल , सी.आर.पाटील ,जीवनप्रकाश जैन यांनी शासनाकडे तत्काळ प्रस्ताव सादर केला होता. या मतदार संघाचे खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर केंद्र सरकारच्या वने आणि पर्यावरण मंत्रालयाने तत्काळ मान्यता देऊन मूर्ती निर्माण समितीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत २.७३ हेक्टर जमीन हस्तांतरीत करण्यासाठी हिरवा कंदील दिला होता. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , वनमंत्री सुधीर मुनगुट्टीवार यांनी मुर्तीनिर्माण समितीने सादर केलेल्या प्रस्तावाला गेल्या १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रालयाच्या बैठकीत अंतिम मान्यता देऊन रस्त्याची समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला.हा आदेश नुकताच वन विभागाला प्राप्त झाला असून मंगळवारी (दि.२० ) दुपारी पीठाधीश स्वामी रवींद्रकीर्ती महाराज ,डॉ.पन्नालाल पापडीवाल ,सी.आर.पाटील ,संजय पापडीवाल ,जीवनप्रकाश जैन ,प्रमोद जैन ,पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून पर्वतावर जाण्याचा मार्ग खुला करण्यात आला आहे. शासनाच्या या आदेशामुळे देशभरातूनयेणाºया भाविकांची मोठी सोय होणार आहे.पंधरावर्ष मांगीतुंगी पावर्तावर उत्खननगनीनीप्रमुख ज्ञानमती माता यांचा मांगीतुंगी पर्वतावर पूर्वमुखी भगवान ऋषभदेव भगवान यांची अखंड पाषाणात १०८ फुट मूर्ती निर्माण करण्याचा मानस होता. ज्ञानमती माता यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी रवींद्रकीर्ती महाराज ,महामंत्री डॉ.पन्नालाल पापडीवाल ,सी.आर.पाटील यांनी २००२ मध्ये भगवान ऋषभदेव १०८ फुट मूर्ती निर्माण समिती स्थापन करून या कामाला मूर्तरूप दिले. सुमारे पंधरावर्ष मांगीतुंगी पावर्तावर उत्खननाचे काम करून अखंड पाषाणाचा शोध लागल्यानंतर भगवान ऋषभदेवांची १०८ फुट उंच मूर्ती कोरण्यात आली.