मातोरी : केंद्र सरकारकडून देण्यात येणारा मोफत तांदूळ पोहोचलाच नसल्याने वाटप करणार कसे? असा सवाल उपस्थित करीत रेशनदुकानदारांची पुरवठा विभागाकडेच बोट केल्याने कार्डधारक संभ्रमात पडले आहेत. दुकानदारांनी काहीच माहीत नसेल तर सामान्य कार्डधारकांना उत्तरे कोण देणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मखमलाबाद, मातोरी, दरी, चांदशी, मुंगसरे, यशवंतनगर, असे सहा रेशनदुकाने असून, लॉकडाउन कालावधीसाठी शासनाकडून सांगण्यात आलेला धान्यसाठा अजून मिळालेलाच नाही. त्यामुळे वाटप तरी काय करावे? असा सवाल रेशन दुकानदारांनी केला आहे. कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी शासनाने लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे संचारबंदी लागू झाली, जनतेची संचारबंदीकाळात उपासमार होऊ नये यासाठी मोफत धान्य देण्याचा निर्णयघेतला आहे. मात्र ग्रामीण भागातील जनता वंचितच असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
मोफत तांदूळ पोहोचलाच नाही, तर वाटणार कसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 9:56 PM