खर्डे : देवळा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना बुधवारी (दि.२६) देवळा तहसील कार्यालयात मोफत बियाणे वाटप करण्यात आले.दुष्काळसदृश परिस्थिती व कर्जबाजारीपणामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे. याप्रकारामुळे त्या कुटुंबांची वाताहात झाल्याने त्यांना मदत म्हणून शासनाच्या वतीने चालू खरीप हंगामासाठी मोफत बियाणे देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नाशिक जिल्हा अॅग्रो डीलर्स व देवळा तालुका अग्रो डिलर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने देवळा तालुक्यातील चार आत्महत्या ग्रस्त कुटुंबाना मोफत बियाणे वाटप करण्यात आले.तालुक्यात सन २०१८ मध्ये नारायण पंडित शेवाळे (४० रा. खामखेडा), पांडुरंग त्रंबक अहिरराव (३९ रा. दहिवड), कृष्णा भिला सूर्यवंशी (३६ रा. खालप), गंगाधर भिला भदाणे (५८ रा. कापशी) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. यांच्या वारसांना देवळा येथे तहसीलदार दत्तात्रय शेजुळ, तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रशांत पवार यांच्या हस्ते मोफत बियाणांचे वाटप करण्यात आले.यावेळी अॅग्रो असोशिएशनचे तालुका अध्यक्ष तुषार वाघ, माफदाचे संचालक जगदीश पवार, नाडाचे संचालक रामचंद्र आहेर, बापु भामरे, रविंद्र सुंयवंशी आदी सभादास उपस्थित होते.
आत्महत्याग्रस्त कुटुंबाना मोफत बियाणे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 19:36 IST
खर्डे : देवळा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना बुधवारी (दि.२६) देवळा तहसील कार्यालयात मोफत बियाणे वाटप करण्यात आले.
आत्महत्याग्रस्त कुटुंबाना मोफत बियाणे वाटप
ठळक मुद्देदेवळा तहसील कार्यालयात मोफत बियाणे वाटप करण्यात आले.