सिन्नर : येथील हेल्पींग ह्युमन फाउंडेशनतर्फे शहरातील देवीमंदिर रोड व आयटीआय या भागातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत म्हणून मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. सुमोर दोन वर्षांपासून परिसरातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात येत आहे.दिलीप विष्णूपंत देशमुख यांनी त्यांच्या घराच्या प्रांगणात वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला. योगेश देशमुख हे दरवर्षी जॉय आॅफ गिवींग अर्थात देण्याचा आनंद या उपक्रमांर्तगत दरवर्षी वह्यांचे वाटप करतात. बालवाडी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना घरोघरी जावून वह्यांचे वाटप करण्यात येते. यावेळी सुमारे २०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा याप्रमाणे मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. हेल्पींग ह्युमन फाउंडेशन ही एक अधिकृत नोंदणी संस्था असून नेहमीच सामाजिक कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांच्या व स्वयंसेवक नेहमीच भाग घेत असतात.संस्थेचे सदस्य मनोज नाफडे, सचिव योगेश देशमुख, संदीप पाटोळे, कोमल बोंडे, रवींद्र देशमुख, रामु माळी, नारायण बोºहाडे, रंगनाथ सोनवणे आदींसह नागरिक उपस्थित होते. संस्थेने केलेल्या स्तुत्य उपक्रमाबद्दल पालक वर्गाने कौतुक केले आहे.
आर्थिक दुर्बल घटकांना मोफत वह्या वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 5:52 PM