नांदगाव : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील हुशार, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षेचे योग्य, उत्कृष्ट व विनामूल्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने डी.एल. एड् इंग्लिश टिचर फोरम, महाराष्ट्रच्या वतीने दिनांक १ ऑगस्टपासून ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. आठवड्यातील प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी सायंकाळी ४ ते ६ यावेळेत हे मार्गदर्शन केले जाणार आहे. महाराष्ट्रातील तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन होणार आहे. या मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्रातील प्राचार्य तसेच डी. एल.एड् कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक यांनी सदरची माहिती आपल्या जिल्ह्यातीत सर्व कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोफत टीईटी मार्गदर्शन वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:14 AM