पेठ -समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ च्या पेठ तालुक्यातील जवळपास २० हजार ५५४ विद्यार्थांना शाळेच्या पिहल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहीती गटशिक्षणाधिकारी संतोष ,विषयप्रमूख वसंत खैरणार यांनी दिली. दिनांक १५ जूनपासून नवीन शैक्षणकि वर्षाला सुरु वात होत असून शाळा सुरू होण्यापूर्वी शाळा स्तरावर तालुक्यातील २२० शाळांना १३ केंद्रप्रमूखांच्या माध्यमातुन २० हजार ५५४ विद्यार्थीसाठी तीन दिवस आधीच पाठयपुस्तके पोहच करण्यात आली आहेत. प्रगत शैक्षणकि महाराष्ट्र उपक्र म अंतर्गत आता शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हातात पुस्तके देण्याचे नियोजन करण्यात येत असून पेठ तालुक्यात जिल्हा परिषद, खाजगी प्राथमिक, अनुदानित माध्यमिक, शासकिय आश्रम शाळांमधील पिहली ते आठवीच्या विद्याथ्र्यांना मोफत पाठयपुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस.एन. झोले, विषयप्रमुख व्ही.एस. खैरणार यांच्या मार्गदर्शनाखाली गटसाधन केंद्राचे विषयतज्ञ भामरे, हेमंत भोये यांनी केंद्रप्रमुखांना केंद्रनिहाय पुस्तकांचे वाटप केले.१ ली व ८वी च्या पुस्तकांची कमतरताया वर्षी इयत्ता १ ली व ८ वीच्या अभ्यासक्र मात बदल करण्यात आल्याने. नवीन अभ्यासक्र माची पुस्तके छपाईसाठी झालेल्या विलंबामुळे पाहिलीच्या मुलांना तीन पैकी एक तर आठवीच्या मुलांना सातपैकी पाच पुस्तकांचे पिहल्या दिवशी वाटप करता येणार आहे.---------------------इयत्ता निहाय पुस्तक वाटप विद्यार्थी संख्या१ ली -२६८२, २ री-२६८२, ३ री -२६०७, ४ थी -२८३५, ५ वी -२६०५, ६ वी -२५१२,७ वी -२३३२, ८ वी -२२९९, एकूण - २०५५४-------------
विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 1:10 PM