शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत नाट्यमय घडामोडी सुरु असताना, शिंदे गट शिवसेना थोड्याच वेळात पहिली यादी जाहीर करणार
2
धक्कादायक! करवाचौथला सासरी जाणाऱ्या महिला पोलिसावर गावाबाहेर अत्याचार; विरोध करताना दात तुटला
3
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
4
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी
5
मोठ्या तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरूवात; Sensex मध्ये ५४५, तर Nifty मध्ये १०२ अंकांची तेजी
6
आजचे राशीभविष्य : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, सामाजिक मान-सन्मान मिळाल्याने प्रसन्न वाटेल
7
घट्ट मिठी अन् प्रेमाचा वर्षाव! सूरज चव्हाणला केदार शिंदेंनी दिली खास भेटवस्तू, व्हिडीओ व्हायरल
8
ज्येष्ठ नागरिकांना लोनची गरज पडली तर करावं? 'हे' ४ पर्याय बनू शकतात 'संकटमोचक', जाणून घ्या
9
गौरी योग: ७ राशींना दिवाळीपूर्वी मोठे लाभ, गुंतवणुकीत नफा; अपार यश, शुभ-सौभाग्याचा काळ!
10
Mutual Fund Investment : ३००० रुपयांच्या SIP नं बनले ५ कोटी रुपये; 'या' म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
11
पहिल्या घटस्फोटावर नीलम कोठारीने पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाली, "त्याने मला माझी ओळख..."
12
T20 World Cup: न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी विजय
13
ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल?
14
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! ही मालिका घेणार निरोप?
15
मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय
16
विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!
17
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
18
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
19
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
20
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर

येवल्यात मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण

By admin | Published: November 22, 2015 11:31 PM

येवल्यात मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण

नगरसूल : येथील जानकी लॉन्समध्ये येवला तालुका पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. माणिकराव शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक किशोर दराडे होते.नगरसूलसह उत्तर - पूर्व भाग दुष्काळी भाग असून, येथील मुलांची स्वप्ने खूप मोठी आहेत. याची जाणीव झाल्याने नगरसूल मध्यवर्ती ठिकाण व येथील लोकसहकार्याची भावना चांगली असल्याने येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी दिली. यावेळी जिल्हा बँक संचालक किशोर दराडे बोलताना म्हणाले की, ५०० लोकसंख्या असणाऱ्या पिंपळ खुंटे गावातून २०० तरुण पोलीस झाले आहेत. याचा निश्चितच अभिमान वाटतो. केवळ पैशाअभावी, योग्य प्रशिक्षण न मिळाल्याने मुलांची स्वप्ने हे स्वप्नेच राहिली, भविष्यात अशी वेळ मुलांवर येऊ नये म्हणून पोलीस विभागाने सुरू केलेला या उपक्र माची दखल संपूर्ण राज्यात घेतली जाऊन निश्चित ग्रामीण भागातील मुलं उंचभरारी घेतील, असा आशावाद माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी माजी सरपंच प्रमोद पाटील, संयोजक प्रसाद पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, सचिन देवाडगाव, प्रवीण विंचू, पोलीस उपनिरीक्षक एम. बी. खैरनार यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. तालुका पोलीस निरीक्षक रूपचंद वाघमारे यांनी प्रास्तविकात प्रशिक्षण केंद्राचे महत्त्व, नियोजन, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन साहेबराव घुगे यांनी केले. जे.एस, पुंड यांनी आभार मानले. व्यासपीठावर पोलीस निरीक्षक रूपचंद वाघमारे, पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक ठोंबे, संयोजक सरपंच प्रसाद पाटीलसह पोलीस निरीक्षक एस. एच. शेख, एम.बी. खैरनार, डी. ए. पाटील, एस. पी. निकम, ज्ञानेश्वर चव्हाणसह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)