अंदरसूल : अंदरसूल परिसरातील शेतक-यांनी पशुधन वाचविण्यासाठी चारा छावणीत मोठ्या प्रमाणावर पशुधन दाखल करीत आश्रय घेतल्याने चारा समस्येचा प्रश्न सुटण्यास मदत झाली मात्र त्यांच्या देखभालीसाठी चारा छावणीत मुक्कामास असलेल्या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेच्यावतीने मोफत किराणा माल व भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले.येवला तालुक्याचे माजी आमदार मारोतराव पवार, युवानेते कुणाल दराडे व शिवसेना पदाधिकारी यांनी अंदरसूल येथील चारा छावणीतील सुमारे दीडशे शेतक-यांना किराणा माल व भाजीपाल्याचे मोफत वाटप केले. याप्रसंगी रतन बोरनारे, भास्कर कोंढरे, झुंजार देशमुख, मंकरद सोनवणे, मनिषा जगताप, अमोल सोनवणे, दिपक जगताप, नारायण दादा देशमुख, शिवाजी वडाळकर, भागिनाथ ढमाले,राजु पागिरे, भागिनाथ थोरात, मारु ती वाकचौरे, पंडित मेहकर, पृथ्वी देशमुख, रवींद्र वाकचौरे, प्रमोद देशमुख, कौतिक ऐंडाईत, संजू घोडके, बाळू देशमुख, काकासाहेब देशमुख, शंकर गायकवाड आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चारा छावणीतील शेतक-यांना मोफत भाजीपाला, किराणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 4:16 PM
अंदरसूल : मुक्कामी दीडशे शेतक-यांना दिलासा
ठळक मुद्देचारा छावणीत मोठ्या प्रमाणावर पशुधन दाखल