मुरकुटे यांनी टॅँकरद्वारे महिनाभर दररोज सहा हजार लीटर पाणी वाड्या-वस्त्यांवर जाऊन मोफत देण्याचा उपक्रम राबविला आहे. या जलसेवेबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. मनेगावसह लगतच्या वस्त्यांवर यंदा मोठी पाणीटंचाई जाणवली. प्रादेशिक योजनेतून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्यामुळे व परिसरात कुठेही पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडली होती. माणसांसह जनावरांची तहान भागवायची कशी हा प्रश्न सर्वांना भेडसावत असताना विविध सामाजिक संस्था, संघटनांनी हात दिला. त्यातून पाणीटंचाईच्या संकटातातून काही अंशी सुटका झाली. राजाराम मुरकुटे यांनी देखील या संकटात मदतीसाठी पुढाकार घेतला. खासगी टॅँकरच्या माध्यमातून गेल्या महिनाभरापासून ते गावाला पाणीपुरवठा करीत आहेत. मागील काळात देखील त्यांनी स्वत:ची विहिर गावकऱ्यांसाठी खुली करून दिली होती. मात्र यंदा ही विहिर कोरडीठाक असल्याने पदरमोड करून टॅँकरच्या माध्यमातून त्यांनी जलसेवा सुरू ठेवली.
मनेगावकरांना मोफत पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 6:56 PM