शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

अनिष्ट प्रथांच्या जोखडातून महिला मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 11:28 PM

एकेकाळी राजेशाही व जहागिरी उपभोगलेल्या देशमुख मराठा समाजातील महिलांना आजही अनेक प्रकारच्या सामाजिक बंधनात राहावे लागत होते. तथापि, सामाजिक कार्यकर्ते, सिन्नर तालुका देशमुख यांच्या पुढाकाराने व अध्यक्ष रवींद्र देशमुख यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांच्या सहकार्याने समाजातील महिला व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणारी पारंपरिक बंधने तोडण्यात आली आहेत.

ठळक मुद्देपारंपरिक बंधनांना फाटा : सिन्नरला देशमुख मराठा समाजाच्या मेळाव्यात निर्णय

सिन्नर : एकेकाळी राजेशाही व जहागिरी उपभोगलेल्या देशमुख मराठा समाजातील महिलांना आजही अनेक प्रकारच्या सामाजिक बंधनात राहावे लागत होते. तथापि, सामाजिक कार्यकर्ते, सिन्नर तालुका देशमुख यांच्या पुढाकाराने व अध्यक्ष रवींद्र देशमुख यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांच्या सहकार्याने समाजातील महिला व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणारी पारंपरिक बंधने तोडण्यात आली आहेत. विद्यार्थी गुणगौरव सोहळा व समाजाच्या मेळाव्यात निर्णय जाहीर करण्यात आले. त्यामुळे देशमुख समाजात परंपरेने चालत आलेल्या चालीरीतींच्या जोखडातून महिलांची मुक्तता झाली आहे.सिन्नर शहरातील देशमुख मराठा समाजाचा मेळावा व विद्यार्थी आणि सेवानिवृत्त समाजबांधव सत्कार सोहळा गुरुवारी भगवती मंगल कार्यालय येथे पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. के. के. देशमुख, प्रा. डॉ. लता देशमुख, नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक रवींद्र देशमुख, नगरसेवक वासंती देशमुख, समाजाचे उपाध्यक्ष संतोष देशमुख, बाळासाहेब देशमुख उपस्थित होते. सिन्नरमधील देशमुख समाजाने महिलांविषयी घेतलेले निर्णय अत्यंत कौतुकास्पद असून, काळानुसार बदललेच पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. देशमुख यांनी केले. तसेच समाजातील विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षणाची कास धरावी, असे आवाहन केले.अध्यक्ष रवींद्र देशमुख यांनी संमेलनात गत चार वर्षांपासून महिलावर्गास प्रथम जेवण करण्याची पद्धतदेखील सुरू केली असून, समाजात यापुढे अंत्यसंस्कार होत असताना पार्थिवाची आरती करण्याची पद्धत बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. विकास करायचा असेल तर काळानुसार बदलले पाहिजे, तसेच घरात उच्चशिक्षित सून म्हणून पाहिजे असते. मात्र, तरीदेखील लोक काय म्हणतील म्हणून महिलांना अनेक गोष्टींपासून रोखत असतो, ही बाब योग्य नाही, असे सचिव अभिजित देशमुख यांनी सांगितले.समाजात महिलांना साडीव्यतिरिक्त ड्रेस परिधान करण्याचीदेखील परवानगी समाजाच्या वतीने देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी जाहीर केली. दत्तात्रय देशमुख, सागर देशमुख, गिरीश देशमुख यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.ज्या महिलांना आप्तेष्टांच्या अंत्ययात्रेत सहभागी व्हायचे असल्यास समाजाला त्याबाबत हरकतनसेल तसेच सक्तीदेखील केली जाणार नाही, असाही निर्णय घेण्यात आला. दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात जाण्यासाठी महिलांना अनुमती देण्यात आली.घुंगटबंदीचा स्तुत्य निर्णयसमाजात आजही ज्येष्ठ महिला घुंगट पद्धतीचे पालन करतात. तसेच कुटुंबात येणाऱ्या सूनबाईनेही या प्रथेचे पालन करावे, असा त्यांना आग्रह असतो. नवीन सुना उच्चशिक्षित असूनही त्यांच्यावर घुंगट पद्धतीचे पालन करण्याची अपेक्षा केली जाते; परंतु यापुढे समाजात घुंगटबंदी करण्याचा निर्णयघेण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकWomenमहिला