शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘मुक्त’चा युवक महोत्सव रंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:33 AM

जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर यश अपयश प्रत्येकाच्याच वाट्याला येते,परंतु कलाक्षेत्रात यश प्राप्तीसाठी मनापासून कलेची साधणा करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री नेहा जोशी यांनी व्यक्त केले. कलाक्षेत्रात वावरताना प्रत्येकाने कलाकाराबरोबरच उत्तम माणूस असणे गरजेचे असून, आपल्यातील अंतर्गत चांगुलपणात कलाक्षेत्रातील यश प्राप्तीसाठी ऊर्जा आणि उत्साह देत असल्याचे जोशी यावेळी म्हणाल्या.

नाशिक : जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर यश अपयश प्रत्येकाच्याच वाट्याला येते,परंतु कलाक्षेत्रात यश प्राप्तीसाठी मनापासून कलेची साधणा करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री नेहा जोशी यांनी व्यक्त केले. कलाक्षेत्रात वावरताना प्रत्येकाने कलाकाराबरोबरच उत्तम माणूस असणे गरजेचे असून, आपल्यातील अंतर्गत चांगुलपणात कलाक्षेत्रातील यश प्राप्तीसाठी ऊर्जा आणि उत्साह देत असल्याचे जोशी यावेळी म्हणाल्या.  नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या युवक केंद्रीय महोत्सवाचे अभिनेत्री नेहा जोशी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, वित्त अधिकारी मगन पाटील, कुलगुरू ई. वायुनंदन आदी उपस्थित होते. नेहा जोशी म्हणाल्या, आपल्यातील गुणांचा वापर होणाºया घटकांशी स्वत:ला सामावून घेतल्यास यश निश्चित मिळते. क्षेत्र कोणतेही निवडा त्यात यश मिळवायचे असेल तर कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही. अभिनय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. अभिनयात तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही किती कसदार अभिनय करता याची पारख आधी होत असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. युवा महोत्सवात विविध १७ कला प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या.  स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना कुलगुरू प्रा. ई वायुनंदन यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धांमध्ये निवड झालेले विद्यार्थी दि. ५ नोव्हेंबरपासून परभणी येथे सुरू होणाºया इंद्रधनुष्य या आंतरविद्यापीठ स्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. बहि:शाल केंद्राच्या प्रमुख प्रा. विजया पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन श्याम पाडेकर यांनी केले. युवक महोत्सवातील स्पर्धांचा निकाल विद्यापीठ युवक महोत्सवात नाशिक विभागातील ज्योती चव्हाण हिने पोस्टर स्पर्धेत, तर स्पॉट फोटोग्राफीमध्ये प्रसाद पवार व मृदुमूर्तिकलेत आकाश कंकाळ यांनी अजिंक्यपद पटकावले असून, कोल्हापूर विभागातून श्याम तांबे याने शास्त्रीय तालवाद्य प्रकारात, तर प्रश्नमंजूषेत श्रुतिका लड्डे व दीपाली माणगावे आणि कोलाजमध्ये प्रतीक जाधव स्पॉट पेंटिंगमध्ये कोल्हापूरचाच आकाश व्हटकर, पुणे विभागातून शास्त्रीय नृत्यामध्ये श्रावणी शेलार, वक्तृत्व स्पर्धेत अंकिता साळुंके, नागपूर विभागातून भारतीय सुगम संगीतामध्ये चेतन बनसोड, औरंगाबाद विभागातून मिमिक्र ीमध्ये अनिकेत कोकाटे, अमरावतीतून रांगोळीत पूजा अमझरे यांची परभणी येथे होणाºया अांतरविद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.१७ कलाप्रकारांचे सादरीकरण विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवात राज्यभरातून विविध विभागीय केंद्रातील सुमारे सव्वाशे स्पर्धकांनी विविध १७ कलाप्रकारांत सहभाग नोंदवत वेगवेगळ्या कलाविष्कारांचे सादरीकरण केले. यात एकांकिका, मूक अभिनय, विडंबन नाट्य, गायन, वादन, चित्रकला, रांगोळी, फोटोग्राफी, वादविवाद, नृत्य, वक्तृत्व, रांगोळी आणि प्रश्नमंजूषा अशा विविध १७ कलाप्रकाराच्या स्पर्धा घेण्यात आल्या. परीक्षक म्हणून बाळ नगरकर, मिलिंद देशमुख, श्याम पाडेकर, सुनील देशपांडे, मकरंद हिंगणे, शुभांजली पाडेकर, आनंद अत्रे, सुमुखी अथनी, हसन इनामदार, ऋ षिकेश अयाचित, अवि जाधव, हर्षद वडजे, रवींद्र राजोरीकर, माणिक कानडे आदींनी काम पाहिले.