नाशिक : आपल्या देशामधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. समाजातील अनेक घटकांचा आवाज दाबला जात आहे. मग बळीराजा असो किंवा कष्टकरी कामगार; मात्र माध्यमांकडून त्यांच्या समस्यांना वाचा फोडली जाताना दिसत नाही. काही मोजक्याच लोकांच्या हातांमध्ये माध्यमेगेली असल्याची खंत प्रसिद्ध माहितीपट निर्माते अंजली मोंटेरो, के.पी. जयशंकर यांनी बोलून दाखविली.निमित्त होते, अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट, नाशिकच्या वतीने ७व्या अंकुर फिल्म फेस्टिव्हलचे. गुरुवारी (दि.२०) कुसुमाग्रज स्मारकात आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलच्या शुभारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अभिव्यक्ती संस्थेचे अनुराग केंगे, रघुनाथ फडणीस, महेश जगताप उपस्थित होते.यावेळी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर बोलताना मोंटेंरो व जयशंकर यांनी माध्यमे सत्यस्थितीचे वार्तांकन काही अपवाद वगळता करत नसल्याचे सांगितले. अशावेळी महितीपट, लघुुपटांच्या माध्यमातून अनेक सामाजिक आशय असलेले विषय समाजापर्यंत दर्जेदारपणे पोहोचविता येतात. त्यासाठी अशाप्रकारच्या फेस्टिव्हलची गरज असते.मागील सहा वर्षांपासून नाशिकमध्ये आयोजित केले जाणारे ‘अंकुर’ हे उत्तम व्यासपीठ असल्याचे ते म्हणााले.यावेळी मोंटेरो यांनी ‘अ डेलिकेट विव’ या माहितीपटाबद्दल माहिती दिली. कच्छ येथे तीन फिल्म बनवल्या आहेत. दरम्यान, माहितीपट व फेस्टिव्हलची सिग्नेचर फिल्म दाखवण्यात आली. काजल बोरस्ते हिने प्रास्ताविक केले.
‘सर्वसामान्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:59 AM