पंचवटी : लग्नाचा मंडप उभारण्यावरून झालेल्या वादाची तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या दोन गटांतील महिलांमध्ये पोलीस ठाण्याच्या आवारातच हाणामारी झाल्याची घटना घडली़ यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील या महिलांनी धक्काबुक्की केल्याचे वृत्त आहे.पेठरोडवरील भराडवाडी येथे रविवारी सायंकाळी विवाह सोहळा होणार होता. वधू भराडवाडीतील असल्याने वधूकडच्या नातेवाईक मंडळींनी घरासमोर लग्नमंडप उभारलेला होता. सदर मंडप या परिसरात राहणाºया एका शिंदे नामक व्यक्तीच्या दरवाजाला लागूनच उभारल्याने शिंदे यांनी वधूकडील नातेवाइकांना मंडप काढून घ्या व सायंकाळी पुन्हा मंडप लावा, अशी विनवणी केली, मात्र मंडप काढण्यास सांगितल्याचा राग आल्याने त्यांच्यात शाब्दिक चकमक आणि धक्काबुक्की झाल्याने शिंदे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यापाठोपाठ वधूपक्षाकडील मंडळीदेखील पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी तेथेच त्यांच्यात हाणामारी झाली़ पोलिसांनी हाणामारी करणाºया महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे समजते.
पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात महिलांमध्ये फ्रीस्टाइल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:43 AM
लग्नाचा मंडप उभारण्यावरून झालेल्या वादाची तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या दोन गटांतील महिलांमध्ये पोलीस ठाण्याच्या आवारातच हाणामारी झाल्याची घटना घडली़ यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील या महिलांनी धक्काबुक्की केल्याचे वृत्त आहे.
ठळक मुद्देलग्न मंडपाचा वाद : महिला पोलिसांनाही धक्काबुक्की