सिडको : कोविड- १९ महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा वाहतूकसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. उद्योग-व्यवसायासाठी व कारखान्यातील उत्पादित माल ग्राहकांपर्यंत पोहोच करता यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्य परिवहन महामंडळास प्रवासी वाहतुकीसह मालवाहतुकीस परवानगी दिली आहे. कारखान्यांमध्ये तयार होणारा माल व कच्च्या मालाची वाहतूक महामंडळाच्या बसेसमधून केली जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. राज्य परिवहन नियंत्रक नितीन मेंद, विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील, पर्यवेक्षक हरीश पाटील व आयामा पदाधिकारी यांची बैठक आयामा सेंटर येथे पार पडली. यावेळी संबंधित विषयावर विस्तृत चर्चा झाली. बैठकीला आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, माजी अध्यक्ष, सल्लागार समितीचे चेअरमन धनंजय बेळे, माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, राजेंद्र पानसरे उपस्थित होते.-------------------बैठकीत राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यांनी सांगितले की, राज्य परिवहन महामंडळास महाराष्ट्र राज्यात वाहतुकीचा प्रदीर्घ अनुभव आहे. बसेसच्या वतीने तत्काळ सेवा उपलब्ध आहे, दरही माफक आहे, सुरक्षित तसेच वेळेवर माल निश्चितस्थळी पोहोच होणार आहे.
राज्य परिवहन महामंडळातर्फे उद्योगांसाठी मालवाहतूक सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 10:22 PM