नाशिक : इगतपुरी येथील कसारा घाटातील जव्हार फाट्याजवळ रेल्वे मालगाडीचे चाक शुक्रवारी (दि.१८) दुपारी ३ वाजेच्या सुमारास रुळावरून घसरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
मुंबईहून येणारी मालगाडी कसारा घाट पार करत असतांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घाटातील जव्हार फाट्याजवळ (टीजीआर ३ जवळ) मालगाडीचा डबा रुळावरुन घसरला. त्यामुळे डाऊन मार्गाची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र ताबडतोब रेल्वे प्रशासनाला सदर माहिती मिळताच मालगाडीचे चाक रुळावर आणण्यासाठी रेल्वे दुर्घटना सहाय्यता गाडीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी भर पावसात युद्धपातळीवर काम सुरू केले. या घटनेमुळे मुंबईहून येणाऱ्या (डाऊन) मेल व एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर काही परिणाम झाला नाही. सदर गाड्या दुसऱ्या रेल्वे मार्गावरून वळवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
फोटो- १८ कसारा रेल्वे
===Photopath===
180621\18nsk_43_18062021_13.jpg
===Caption===
फोटो- १८ कसारा रेल्वे