नाशिक : जागतिक मैत्र दिनानिमित्त पंचवटीतील व्हिक्टोरिया (अहल्याबाई होळकर) पूल येथे रविवारी (दि. ७) पुलाच्या कठड्याला फे्रंडशिप बँड बांधून आणि मानवी साखळी करत ‘फे्रंडशिप डे विथ व्हिक्टोरिया’ हा आगळावेगळा फे्रंडशिप डे साजरा करण्यात आला.शहरातील विविध सामाजिक संघटना, तसेच युवकांनी एकत्र येत मैत्र दिनाचे औचित्य साधत ऐतिहासिक ओळख असलेल्या शहरातील १२५ वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन पुलाप्रती यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. नाशिक आणि पंचवटी या परिसराला जोडणाऱ्या या पुलाची निर्मिती इंग्रज सरकारच्या काळात झाली होती. शहराला जोडणाऱ्या या पुलाविषयी नाशिककरांचे भावनिक नाते जोडले गेले असून, ते अधिक दृढ करण्याच्या निश्चयाने या उपक्र माचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सनविवि फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज बच्छाव यांनी यावेळी दिली.या उपक्रमात सनविवि फाउंडेशन, युवान, स्पार्टन्स, विवेक वाहिनी, विद्यार्थी न्याय मंच, एकनिष्ठा युवा फाउंडेशन, शिवकार्य गडकोट मोहीम या सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. (प्रतिनिधी)
‘फे्रंडशिप डे विथ व्हिक्टोरिया
By admin | Published: August 07, 2016 10:26 PM