नाशिक-उत्तर भारतियांचा श्रावण मास सुरु झाला असून शहरात लाखाच्या संख्येने स्थायिक असणाऱ्या उत्तरभारतीयांकडून श्रावणमासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळत आहे.श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या आराधनेला मोठे महत्व आहे. बिहारमधील बाबा वैजनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेणे याला सर्वाधिक महत्व आहे पण ज्यांना नोकरी, व्यवसायामुळे तेथे जाणे शक्य नाही ते भाविक त्र्यंबकेश्वर, कपालेश्वर, सोमेश्वर आदि ठिकाणी जाऊन दर्शन घेण्यावर, लघुरुद्र, महारुद्र, अभिषेक आदि विधी करुन घेण्यावर भर देत आहेत. गोदाघाट, कुशावर्त, सोमेश्वर आदि ठिंकाणी गंगास्रान, गंगापूजन, दिपदानही आवर्जुन केले जात आहे. उत्तर भारतीय बांधवांकडून श्रावणमास सुरु होताच दर सोमवारी उपवास, महादेवाचे दर्शन, दानधर्म आदि गोष्टी आवर्जुन केल्या जात आहेत. पुरोहितांकडून पुजा अर्चाही करुन घेतली जात आहे. या महिन्यात सोळा सोमवार व्रताला प्रारंभही केला जातो. महाराष्टÑात श्रावण महिना रविवारपासून (दि.१२) सुरु होत आहे.
श्रावणमासानिमित्त उत्तर भारतियांकडून धार्मिक कार्यक्रमांवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 4:27 PM
श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या आराधनेला मोठे महत्व
ठळक मुद्देश्रावण महिन्यात भगवान शंकराच्या आराधनेला मोठे महत्व