शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

दोस्तो! सुना क्या, सावरकर नगरमे फिरसे बाघ आया था...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 1:14 AM

‘दोस्तो! सुना क्या, सावरकर नगर, गंगापूररोड मे फिरसे बाघ आया था... ’ ‘क्या करेंगे बेचारे मनुष्य ने स्वार्थ के कारण इनके जंगल (घर) तोड डाले...’ हे संवाद आहेत छोटा भीमच्या गॅँगमधील टीमचे. जग्गूच्या एका संवादावर सारे चर्चा करतात आणि छुटकी या पुढे झाडे तोडायची नाही याची मुलांना शपथच देते...

नाशिक : ‘दोस्तो! सुना क्या, सावरकर नगर, गंगापूररोड मे फिरसे बाघ आया था... ’‘क्या करेंगे बेचारे मनुष्य ने स्वार्थ के कारण इनके जंगल (घर) तोड डाले...’ हे संवाद आहेत छोटा भीमच्या गॅँगमधील टीमचे. जग्गूच्या एका संवादावर सारे चर्चा करतात आणि छुटकी या पुढे झाडे तोडायची नाही याची मुलांना शपथच देते... एखाद्या व्हिडीओत नाही तर ही सारी पात्रे महापालिकेच्या पुष्पोत्सवानिमित्त लहानग्यांची जिवाभावाची पात्रे भेटून संदेश देणार आहेत.महापालिकेच्या वतीने येत्या शुक्रवार (दि.२३) पासून पुष्पोत्सव सुरू होत असून, सध्या त्याची जय्यत तयारी महापालिकेत सुरू आहे. राजीव गांधी भवनचे प्रवेशद्वार सुशोभित करण्यात आले असून, सुरुवातीला हिरवळीवर नर्सरीचे स्टॉल्स आहेत. परंतु राजीव गांधी भवनात केवळ पुष्पोत्सवाचा दरवळ असणार आहे. पुष्पमहोत्सव आणि पुष्प स्पर्धा विविध गटात असल्याने राजीव गांधी भवनच्या तिन्ही मजल्यांवर सध्या टेबल टाकणे आणि अन्य कामांची धावपळ सुरू आहे. भवनच्या एका बाजूने खाद्यपदार्थांचे स्टॉल्सदेखील असणार आहेत. दरम्यान, पुष्पोत्सवाच्या निमित्ताने महापालिकेत छोट्या भीमची टीम दाखल झाली आहे. जाडू कालिया, माकड जग्गू, ढोलू-मोलू, किडकिडीत छुटकी आणि टकलू राजू अशी वेगळ्या चेहऱ्यांची आणि पेहरावाची पात्रे म्हणजे बच्चे कंपनीचे सवंगडीच. नाशिक शहरातील सावरकरनगरमध्ये दोन वेळा बिबट्या येऊन गेला. तो का आला तर शहराभोवतीची झाडे तोडल्याने जंगल कमी झाले आणि त्यामुळे त्यांना शहरात यावे लागले. या ताज्या प्रसंगावर छोटा भीमची टीम संवादात्मक रूपाने पर्यावरणाचे महत्त्व पटविणार असून त्यांचे स्टॅच्यू दाखल झाले आहेत.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक