चांदवड - भारतीय कम्युनिष्ट पक्ष (मार्क्सवादी )व चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने दि. ८ जानेवारी रोजी कामगारांच्या देशव्यापी संपात पाठिंबा देण्यासाठी व प्रमुख मागण्यासाठी चांदवड तहसीलदार कार्यालयावर महिला पुरुषांनी मोर्चा काढला मोर्चाच्या वतीने नायब तहसीलदार हेमंत गुरव यांना निवेदन दिले. मोर्चा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीपासून निघुन तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण व जीवनावश्यक वस्तुंच्या सट्टाबाजारावर बंदी, पेट्रोल , डिजेल,वरील राज्य व केंद्र सरकारचे कर कमी करणे, महागाईवर नियंत्रणआणणारी प्रभावी पावले उचला. रेशन दुकानामार्फत १४ जीवनावश्यक वस्तुचा पुरवठा करा, रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाययोजना करुन बेरोजगारीवर नियंत्रण आणा, ग्रामीण व शहरी भागात मागेल त्याला किमान वेतन मिळणाऱ्या कामाची हमी द्या, त्याची अंमलबजावणी करा, केंद्र व राज्य सरकारी खात्यातील २४ लाख रिक्त पदे भरा, ही पदे भरतांना विविध खात्यातील वर्षानुवर्षे काम करणाºया रोजदारी कंत्राटी मानधनावरील व तत्सम कामगारांना कायम सेवेत सामावुन घ्या आदिसह १२ मागण्या तर किसान सभेच्या मागण्यामध्ये वनजमिनी कसत शेतकºयांच्या नावे करा, कष्टकरी शेतकरी व शेतमजुरांनासंपुर्ण कर्जमुक्त करा,शेतीमालाला सर्वकष खर्चाच्या दीडपट भावाची कायदेशीर हमी द्या, शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी स्वस्त दरात बियाणे उपलब्ध करुन द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शेतकरी शेतमजुरांना वयाच्या ६०वर्षानंतर किमान पाच हजार रुपये पेन्शन घ्या, , शेतकºयांना पिकांसाठी सर्वकष पीक विमा , पशु व कुंटूबासाठी आरोग्य व जीवन विम्याचे सर्वकष संरक्षण द्या आदि मागण्याचे निवेदन दिले यावेळी जिल्हा कमेटी सदस्य हनुमंत गुंजाळ, कॉ.सिताराम ठोंबरे, कॉ. राजाराम ठाकरे, तुकाराम गायकवाड, कॉ. सुकदेव केदारे, दौलत वटाणे,शब्बीर सैय्यद अािदसह कम्युनिष्ट पक्ष मार्क्सवादी व किसान सभेचे महिला पुरुष उपस्थित होते.
चांदवड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 4:40 PM
चांदवड - भारतीय कम्युनिष्ट पक्ष (मार्क्सवादी )व चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने दि. ८ जानेवारी रोजी कामगारांच्या देशव्यापी संपात पाठिंबा देण्यासाठी व प्रमुख मागण्यासाठी चांदवड तहसीलदार कार्यालयावर महिला पुरुषांनी मोर्चा काढला मोर्चाच्या वतीने नायब तहसीलदार हेमंत गुरव यांना निवेदन दिले.
ठळक मुद्देकिसान सभेच्या मागण्यामध्ये वनजमिनी कसत शेतकºयांच्या नावे करा, कष्टकरी शेतकरी व शेतमजुरांनासंपुर्ण कर्जमुक्त करा,शेतीमालाला सर्वकष खर्चाच्या दीडपट भावाची कायदेशीर हमी द्या, शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी स्वस्त दरात बियाणे उपलब्ध करुन द्या, स्वामिन