शहरं
Join us  
Trending Stories
1
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
3
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
4
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
5
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
6
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
7
ग्राहकाचे 50 पैसे ठेवणं डाक विभागाला भोवलं! आता भरपाई पोटी किती रुपये द्यावे लागणार? निकाल जाणून थक्क व्हाल!
8
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
9
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत किती मराठा उमेदवार?
11
"उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन
12
"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा
13
'आम्ही युद्धाचे नाही, संवाद अन् मुत्सद्देगिरीचे समर्थक', BRICS मधून पीएम मोदींचा जगाला संदेश
14
आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत
15
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक आरोपी सापडला; आतापर्यंत ११ जणांना अटक
17
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?
18
Mahayuti Seat Sharing: 106 जागांचा गुंता, कोणत्या विभागातील किती जागांची घोषणा बाकी?
19
मंत्रि‍पदासाठी फोन आला, १०० रुपये उसने घेऊन कपडे घेतले अन् शपथविधीला गेले; श्रीगोंद्यातील नेत्याचा किस्सा! 
20
अरे देवा! ७ मुलांची आई बॉयफ्रेंडसह पळून गेली, ढसाढसा रडत मुलांनी गाठलं पोलीस ठाणं, म्हणाले...

फेरीवाल्यांचा जागा मागणीसाठी मोर्चा

By admin | Published: November 22, 2015 12:09 AM

मुख्य मार्गावर हवे फेरीवाला क्षेत्र : विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

नाशिकरोड : हॉकर्स टपरीधारक व झोपडपट्टीवासीयांच्या विविध समस्यांबाबत पीपल्स रिपाइंच्या वतीने मनपा विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वर्दळीच्या ठिकाणी फेरीवाल्यांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने मनपाच्या माध्यमातून नाशिकला स्मार्ट सिटी उभारण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे; मात्र गोरगरीब व मध्यमवर्गीयांना अच्छे दिन दाखवून फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. या स्मार्ट सिटीमध्ये कोणते प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याची पुसटशी कल्पनादेखील लोकांना माहिती करून दिलेली नाही. शहरातील झोपडपट्टी व हॉकर्स टपरीधारकांना याचा काय लाभ होणार आहे याबाबतची माहिती दिलेली नाही. हॉकर्स व टपरीधारकांना वर्दळीच्या ठिकाणीच व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी व त्यांना टपऱ्या वाटप करण्यात याव्या. तसेच इंदिरानगर, प्रकाश आंबेडकर, श्रमिक नगर, चव्हाण मळा ठिकठिकाणच्या झोपडपट्ट्यांमध्ये सुविधा पुरविण्यात याव्या. या ठिकाणी गटारी तुंबलेल्या असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे आदिंबाबत मनपा लागलीच कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. यावेळी पक्षाचे शशिकांत उन्हवणे, संदीप काकळीज, नवनाथ कातकाडे, देविदास डोके, मिलिंद निकम, सोपान जाधव, प्रवीण जाधव, नीलेश उन्हवणे, सीताबाई कातकाडे, सुनीता कर्डक, अलका निकम, कांताबाई पाल आदिंसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. (प्रतिनिधी)