अशोक चव्हाण : पदाधिकाऱ्यांशी चर्चामनमाड : भाजपा-शिवसेना सरकारचे सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने राज्यात विविध ठिकाणी मोर्चे निघत आहे. मराठा समाजाचे सर्वत्र निघत असलेले मोर्चे हे राजकीय नसून या निष्क्रिय सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या जनतेचा संताप असल्याची टीका माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश कॉँगे्रसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.धुळे येथील कार्यक्रम आटोपून परतीच्या प्रवासात नांदेड येथे जाण्यासाठी मनमाड रेल्वेस्थानकावर आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. मनमाड शहर कॉँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. फलाटावरच त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजी आमदार अनिल अहेर, शहर अध्यक्ष अफजल शेख, रहेमान शहा, प्रकाश गवळी, सुभाष नहार, भीमराव जेजुरे, विलास अहेर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नंदीग्राम एक्स्प्रेसने ते नांदेडकडे रवाना झाले. (वार्ताहर)
सरकारवरील नाराजीतूनच मोर्चे
By admin | Published: September 14, 2016 9:45 PM