घोटी : विविध मागण्यांसाठी सीटूने रविवारी मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीवर मोर्चा काढला. कंपनी व्यवस्थापनाकडून स्थानिक युवकांना कामावर घेण्याच्या विषयावर निर्णय होत नसल्याचा निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला.मुंढेगाव येथून मोर्चाची सुरु वात करण्यात आली. यावेळी स्थानिकांना नोकऱ्यांत प्राधान्य, कंपनी आवारातील व्यवसाय बंद करावे, कंपनी प्रवेशद्वारावरील व्यावसायिक टपरीधारकांना पाणी, वीज कनेक्शन द्यावे. किमान वेतन देऊन कामगारांना कायम करावे याप्रमुख मागण्या मोर्चेकºयांनी मांडल्या. कंपनीच्या अधिकाºयांशी यावेळी झालेल्या चर्चेत मार्ग निघू शकला नाही. त्यामुळे पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यातआली. यावेळी जिल्हा नेते देवीदास आडोळे, जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, तुकाराम सोनजे, दत्ता राक्षे, चंद्रकांत लाखे, कांतिलाल गरुड आदींनी मोर्चात सहभाग घेतला.
मुंढेगावच्या जिंदाल कंपनीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 1:01 AM
घोटी : विविध मागण्यांसाठी सीटूने रविवारी मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीवर मोर्चा काढला. कंपनी व्यवस्थापनाकडून स्थानिक युवकांना कामावर घेण्याच्या विषयावर निर्णय होत नसल्याचा निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला.
ठळक मुद्देआंदोलनाची दिशा ठरवण्यात आली.