शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

नाशिकमध्ये आघाडीचे भवितव्य टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 5:19 AM

कोकाटे यांची बंडखोरी सेनेला डोईजड; राष्ट्रवादीची मदार मित्रपक्षांवर

- श्याम बागुलनाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा युतीविरुद्ध आघाडी अशीच लढत होत आहे. मात्र माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची अपक्ष उमेदवारी व बहुजन वंचित आघाडीने ऐनवेळी उमेदवार दिल्यामुळे वरकरणी चौरंगी होत असलेल्या या लढतीत कोणाची उमेदवारी कोणत्या उमेदवाराला फायदेशीर व तोट्याची ठरते यावरच युती, आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे, तर आघाडीकडून माजी खासदार व छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. एक अपवादवगळता नाशिक मतदारसंघाने सलग दुसऱ्यांदा तोच खासदार निवडून दिलेला नाही. त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक अटीतटीची आहे. त्याचप्रमाणे तुरुंगातून सुटल्यानंतर भुजबळ यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून, गेल्या निवडणुकीत गोडसे यांनी छगन भुजबळ यांचा पराभव केला होता. त्याचा वचपा काढण्याचा प्रयत्न भुजबळ यांच्याकडून होत आहे.निवडणुकीच्या अगोदर बहुजन वंचित आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही, अशी घोषणा केली होती. परंतु समीर उमेदवार झाल्यामुळे त्यांनी पवन पवार यांना उमेदवारी देऊन आघाडीसमोर आव्हान उभे केले आहे, तर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे ते अपक्ष लढत आहेत. त्यांची उमेदवारी शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखीची ठरली असून, त्याचा फायदा आघाडीला होण्याची शक्यता अधिक आहे.अर्थातच, वंचित आघाडीचा फटका राष्टÑवादीला बसण्याची भीती आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्या जाहीर सभा होऊन वातावरणनिर्मिती झाली आहे. दुसºया टप्प्यात मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या सभा आहेत. त्याचप्रमाणे नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांचीही अंतिम टप्प्यात सभा होणार असल्याने कुंपणावरच्या मतदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. नाशिक हा एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला होता. महापालिकेपासून विधानसभेपर्यंत मनसेचे वर्चस्व होते. त्यामुळे राज यांच्या युतीविरोधी प्रचाराला मतदार कसा प्रतिसाद देणार यावर मतांची गणिते अवलंबून आहेत.गेल्या पाच वर्षात उडान योजनेंतर्गत नाशिक हवाई सेवेशी जोडले, शंभर एकर क्षेत्रात टेस्टिंग लॅबचे भूमिपूजन झाले. शंभर एकरमध्ये कृषी टर्मिनल मार्केट मंजूर करून घेतले. विकासाच्या अनेक योजना मतदारसंघात आणल्या. - हेमंत गोडसे,खासदार, शिवसेनापाच वर्षांपूर्वी मंजूर झालेली विकासकामे पूर्णत्वास जाऊ शकली नाही. अनेक प्रकल्प आजही रखडले आहेत.विकासाच्या नुसत्याच बाता मारल्या. कृतीतून काहीच नाही. एक तरी दृश्य प्रकल्प खासदारांनी दाखवावा.- समीर भुजबळ,राष्टÑवादी कॉँग्रेसकळीचे मुद्देमहापालिकेची करवाढ, आघाडी सरकारच्या काळातील मंजूर होऊनही रखडलेल्या प्रकल्पांवर भर.सेनेअंतर्गत गटबाजीला उधाण, रिपाइं आठवले गट नाराज; काँग्रेसचे नेते प्रचारात, कार्यकर्ते मात्र आरामात.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019nashik-pcनाशिकSameer Bhujbalसमीर भुजबळHemant Godseहेमंत गोडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना