गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय आणि नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनानिमित्त कोविड १९ आरोग्य आणि आरोग्यदायी आहार या विषयावर आयोजित वेबीनारमध्ये त्या बेालत होत्या. रंजीता शर्मा यांनी उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार कसा असावा याविषयी माहिती दिली. तसेच भारतीय मसाल्याच्या पदार्थांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. सर्वसामान्यपणे आपण आजारी पडल्यानंतर फळे खातो ही चुकीची पद्धत असून आजाराला बळी न पडण्यासाठी आपण आहारामध्ये फळांचा वापर केला पाहिजे. तरुणांनी आपल्या आहारामध्ये जंक फूडचे सेवन कटाक्षाने टाळावे, असेही त्या म्हणाल्या. सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले तर आभार गणेश नावंदर यांनी मानले.
प्राचार्य डॉ. संजय मांडवकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्राचार्य दीप्ती देशपांडे, प्रसाद कुलकर्णी, डॉ. भारत कौराणी आणि प्रा. संदीप सातभाई उपस्थित होते.
छायाचित्र आर फोटोवर ०२ रंजीता शर्मा