नाशिक- आधीच संचारबंदी त्यात ना फेरीवाला क्षेत्रात हातगाडी लावून फळे विक्र ी करणाऱ्या महिलेस अतिक्र मण पथकाने हटवण्याचा प्रयत्न केला असता तीने गोंधळ घातला आणि आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निवासस्थानासमोर भाजीपाला फेकून संताप घातला. दरम्यान, याप्रकरणात संबंधीत महिलेच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या संचारबंदी असल्याने महापालिका क्षेत्रात निर्धारीत ठिकाणीच फळे आणि भाजीपाला विकता येतोे असे असताना गडकरी चौक येथे फळे विक्री करणाºया महिलेस मनपा कर्मचाऱ्यांनी अडवताच तीने गोंधळ घातला. शशिकला नामदेव खरात नामक या महिलने हात गाड्यावर असणारे काही फळं मनपा आयुक्त मा.राधाकृष्ण गमे याच्या निवासस्थाना समोरील रस्त्यावर टाकुन अडथळा निर्माण केला तसेच पश्चिम विभागाचे अतिक्र मण कर्मचारी श्रीराम मधुकर गायधनी यांच्याशी वाद घालून वजन काट्याच्या भांड्याने स्वत:च्या डोक्यावर मारून घेऊन आरडा ओरड करीत अतिक्र मण विभागाच्या गाडी समोर येऊन ठिय्या मांडला. तसेच सरकारी कामात अडथळा आणला. याा फळविक्र ेत्या महिलेवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, महापालिकेच्या वतीने शहरात फेरीवाला क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे. त्याठिंकाणीच व्यवसाय करणे आवश्यक आहे. सध्या तर संचारबंदी असल्याने तर महापलिकेने निर्धारीत केलेल्या ठिंकाणीच विक्री करावी असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.