शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

फळवीरवाडी,चौराईवाडी पाण्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 6:39 PM

धरणांचा तालुका व पावसाचे माहेर घर अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील म्हैसवळण घाट माथ्याच्या पायथ्याशी असलेल्या अडसरे बु ग्रुप ग्रामपंचायत मधील चौराईवाडी व फळवीरवाडी या दोन्ही दुर्गम आदिवासी वाड्यांमधील आदिवासी बांधव पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकतआहेत.

सर्वतिर्थ टाकेद:धरणांचा तालुका व पावसाचे माहेर घर अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील म्हैसवळण घाट माथ्याच्या पायथ्याशी असलेल्या अडसरे बु ग्रुप ग्रामपंचायत मधील चौराईवाडी व फळवीरवाडी या दोन्ही दुर्गम आदिवासी वाड्यांमधील आदिवासी बांधव पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकतआहेत. पाण्यासाठी आपला रोजगार बुडवून उपाशी पोटी पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. आदिवासी बांधवापुढे रोजगाराचा प्रश्न आ वासून उभा असतांनाच त्यात प्रत्येक दिवस भर उन्हांत पाण्याच्या शोधात घालवावा लागतो आहे. दहा वर्षे मागील ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या काळात अडसरे गावांसह आमच्या चौराईवाडी,फळवीरवाडी या दोन्ही आदिवासी ठाकूर वाड्यांना पाण्याच्या टाकी सह नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. कागदोपत्री ही योजना पूर्ण आहे व योजनेचा मंजूर निधी खर्च झाला आहे.कागदोपत्री ही योजना पूर्ण असल्याने या वाड्यांमध्ये पाणी पोहचले असे दाखवत आहे केवळ योजना पूर्ण दाखवत असल्याने आमच्या या दोन्ही वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकर आजपर्यंत कधीही आला नाही.व प्रत्यक्षात ही योजना राबविली गेलेली नाही. या दोनही वाड्यांमध्ये बांधण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आजही आकाशाखाली कोरड्याठाक पडलेल्या आहेत.आमच्या वाड्यांमध्ये पाण्याची पाईपलाईन सुद्धा नाही.मागच्या वर्षी फळवीर वाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना व अंगणवाडीतील बालकांना पिण्यासाठी येथील शिक्षकांच्या मार्गदर्शनाने व ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून व सहभागातून पाण्याची पाईपलाईन केली व ती पाईपलाईन सुद्धा सध्या फुटलेली आहे तिच्याकडे सुद्धा आजपर्यंत कोणीहीबघितले नसल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी केली आहे/.अशी मोठी समस्या असतांना आजही आमच्या महिला माता भगिणींना दूषित पाण्यासाठी मैलोनमैल संघर्ष करावा लागत आहे.रात्री बेरात्री अंधारात खासगी मालकीच्या विहिरितून पिण्यासाठी गढूळ दूषित पाणी चोरून आणावे लागत आहे. सध्या विद्यमान ग्रामपंचायत ने दिलेला हातपंप व येथील विहिरींनीही तळ गाठला असल्याने मुक्या इथे माणसांनाच पिण्यासाठी पाणी नसल्याने मुक्या प्राण्यांचा शेळ्यांमेंढ्या गुरे वासरांचा जीव धोक्यात आला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून तब्बल सत्तर वर्ष झालीत आण िएकविसाव्या शतकातील ििडजटल आण िपारदर्शक महासत्ता बनू पाहणार्या देशात ग्रामीण आदिवासी भागातील महिलांची दररोज होणारी पाण्यासाठीची भटकंती मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. केवळ वेळोवेळी विद्यमान सरपंचांना व ग्रामपंचायत कार्यकारिणीतील व्यक्तींना हा पाणी प्रश्न प्रत्येक वर्षी वेळोवेळी कळऊनही त्यांनी आजपर्यंत याकडे दुर्लक्ष केले आहे.असा सवाल या आदिवासी बांधवांनकडून केला जात आहे.सदर ग्रामपंचायत पदाधिकार्यांनकडुनही या केवळ कागदोपत्री राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचा खुलासा करण्याचा पत्रव्यवहार चालू आहे असे उत्तर दिले जाते व जुन्या ग्रामपंचायत कार्यकारिणीतील हा गोंधळ व कागदोपत्री योजना राबवली आहे प्रत्यक्षात ही योजना राबविली गेलेली नसल्याने आम्ही सुद्धा पाण्याचा टँकर या वाडीत पाठवायला अपयशी ठरल आहोत असे या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाधिकार्यांकडून बोलले जात आहे.तरी या पाणी प्रश्न स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर सोडवावा व जुन्या केवळ कागदोपत्री पूर्ण असलेल्या व राबवलेल्या पाणी पुरवठा योजनेचा पाठपुरावा करून आमच्या अशिक्षति अडाणीपणाचा फायदा घेणार्या दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी व आमच्या वाड्यांना पाईपलाईन सह पिण्याचे पाणी पुरवावे अन्यथा आमच्या या सातशे लोकसंख्या असलेल्या दोनही वाडी वस्त्यांमधील ग्रामस्थानकडून इगतपुरी येथे तीव्र हंडा मोर्चा काढण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी धोंडू का तोरे, हिरामण कातोरे,कोंडाबाई का तोरे,बकूबाई कातोरे,जमनाबाई कातोरे,आदींदाह येथील बहुसंख्य ग्रामस्थांनकडून व अशिक्षति आदिवासी बांधवांनकडून करण्यात येत आहे. 

 

टॅग्स :Nashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई