घोटी : केंद्र सरकार व राज्य सरकारच्या धोरणांमुळे देशभरात इंधनाचे दर कमालीचे वाढले आहेत. याच्या परिणाम महागाईवर झाला आहे. इंधनाचा विचार केला असता २५ वर्षांतील ही विक्रमी दरवाढ असल्याचे बोलले जात आहे. पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीचा भडका सुरू असतानाच सरकारने गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ केल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे.सरकारच्या या इंधन व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ इगतपुरी तालुका काँग्रेसच्या वतीने आमदार निर्मला गावित व जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी घोटी येथील आठवडे बाजारातून सायकल रॅली काढून शासनाचा निषेध करण्यात आला.या सायकल रॅलीत माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, तालुकाध्यक्ष कचरू डुकरे, पांडुरंग शिंदे, पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी, महिला आघाडी तालुकाध्यक्ष मथुरा जाधव, माजी सभापती मधुकर कोकणे, साहेबराव धोंगडे, कमळाकर नाठे, प्रा. मनोहर घोडे, बाळासाहेब वालझाडे, गुलाब वाजे, भास्कर गुंजाळ, शुभम बेलेकर, दौलत दुभाषे, गुलाब वाजे, कचरू शिंदे, गोपाळ भगत, बन्सी पागेरा, विजय खातले, विलास मालुंजकर, भिका शिंदे, कैलास लकारिया, ज्ञानेश्वर कडू, ज्ञानेश्वर खातळे, संजय तिवडे, मतीन शेख, रमेश शिंदे आदी सहभागी झाले होते.शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आमदार निर्मला गावित, जि. प. उपाध्यक्ष नयना गावित यांच्या नेतृत्वाखाली घोटी येथील आठवडे बाजारातून पोलीस ठाण्यापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. आमदार गावित व नयना गावित यांनी भर उन्हात चक्क दीड किमी अंतर सायकल चालवून दरवाढीचा निषेध केला. यावेळी जनार्दन माळी यांनीही सहभाग नोंदवला.या सायकल रॅलीत इंधन दरवाढीचा निषेध, मोदी सरकार हाय हाय, शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे अशा घोषणादेण्यात आल्या. इतर राज्याचा विचार करता महाराष्ट्रातच इंधनाचे दर अधिक असल्याने सामान्य जनता त्रासली आहे. इंधन दरवाढीचा परिणाम महागाईवर झाला आहे. यावेळी तहसीलदार अनिल पुरे व पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांना निवेदन देण्यात आले.
इंधन दरवाढप्रश्नी कॉँग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 12:46 AM
घोटी : केंद्र सरकार व राज्य सरकारच्या धोरणांमुळे देशभरात इंधनाचे दर कमालीचे वाढले आहेत. याच्या परिणाम महागाईवर झाला आहे. इंधनाचा विचार केला असता २५ वर्षांतील ही विक्रमी दरवाढ असल्याचे बोलले जात आहे. पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीचा भडका सुरू असतानाच सरकारने गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ केल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे.
ठळक मुद्देघोटी : निर्मला गावित यांनी सायकल रॅली काढून केला निषेधइंधन दरवाढीचा परिणाम महागाईवर झाला आहे.