शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

इगतपुरी आगारात इंधन बचत सप्ताहनिमित्त बसचालकांना इंधन बचतीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:53 PM

नांदूरवैद्य : नाशिक जिल्ह्यातील स्थानिक एस टी आगारात शनिवार (दि.१६) पासून इंधन बचत सप्ताह राबविला जात असून या निमित्ताने इगतपुरी येथील आगारात सप्ताह उद्घाटन कार्यक्रमात बस चालकांना इंधन बचतीचे महत्व सांगून इंधनाची बचत कशी करावी, याबाबतचे मार्गदर्शन आगारप्रमुख संदिप पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक योगेश काळे यांनी केले.

ठळक मुद्देइंधन बचतीचे कार्यक्रम न घेता राष्ट्रीय संपत्ती वाचविण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक

नांदूरवैद्य : नाशिक जिल्ह्यातील स्थानिक एस टी आगारात शनिवार (दि.१६) पासून इंधन बचत सप्ताह राबविला जात असून या निमित्ताने इगतपुरी येथील आगारात सप्ताह उद्घाटन कार्यक्रमात बस चालकांना इंधन बचतीचे महत्व सांगून इंधनाची बचत कशी करावी, याबाबतचे मार्गदर्शन आगारप्रमुख संदिप पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक योगेश काळे यांनी केले.इधन ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने इंधन बचत केले पाहिजे. केवळ एस टी प्रशासनापुरती इंधन बचतीचे कार्यक्रम न घेता राष्ट्रीय संपत्ती वाचविण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे असे संदिप पाटील यांनी बस चालकांना इंधन बचतीविषयी मार्गदर्शन करतांना सांगितले.भविष्यात इंधनाची मोठी टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे जेवढी बचत करणे शक्य होईल तेवढी इंधनाची बचत करावी. इंधन बचत करणाऱ्या चालकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर नवीन चालकानींही इंधनाची बचत करावी असे कर्मचारी विलास बिन्नर यांनीआपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले. यानंतर कर्मचारी जुंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चालक व कर्मचारी यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी कैलास गरूड, राकेश सांगळे, योगेश काळे, इंधन लिपिक बागुल, जेष्ठ चालक सुरेश काळे, चिमा पारधी, यांत्रिक कर्मचारी प्रवीण चौधरी, आकाश काळे, दत्ता भांगरेआदींसह आगारातील चालक वाहक तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते.कोट...इंधन बचत करणे हे प्रामुख्याने चालकाच्या हातात असून चालकाने गाडीवर नियंत्रण ठेवल्यास निश्चितच इंधन बचत होण्यास चालना मिळेल. त्याचप्रमाणे चालकांनी एकमेकांशी समन्वय साधत इंधन बचतीसाठी आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे असल्याने यामुळे एस टी ची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.- संदिप पाटील, आगार प्रमुख, इगतपुरी. 

टॅग्स :Bus DriverबसचालकFuel Hikeइंधन दरवाढ