पिंपळगाव बसवंत : त्र्यंबकेश्वर परिसरात जबरी चोरी करून गेल्या कित्येक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा संशयित आरोपी अरुण मुर्तडक याच्या पिंपळगाव बसवंत पोलिसांनी अखेर मुसक्या आवळत जेरबंद केले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरात जबरी चोरी करून फरार असलेला संशयित आरोपी अरुण मुर्तडक याच्यावर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. मात्र, गेल्या कित्येक महिन्यांपासून मुर्तडक फरार होता. त्याच्या तपासकामी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत माहिती पुरविण्यात आली होती. याच माहितीच्या आधारे पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलीस पथकाने सूत्रे फिरवत आरोपीस शहरातील निफाड फाटा परिसरात बेड्या ठोकल्या.
पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज सैंदाने, गोपनीय विभागाचे नितीन जाधव, रवी बारहाते, पोलीस हवालदार मनोज बोराळे, अशोक कदम, अमोल आहेर, संदीप दराडे आदींच्या पथकाने कारवाई करत सदर आरोपीस त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नीलकंठ घोटेकर यांच्याकडे सुपूर्द केले. अधिक तपास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी करत आहेत.
फोटो- १६ पिंपळगाव क्राइम
संशयित आरोपीसमवेत पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पथक.
===Photopath===
161220\16nsk_26_16122020_13.jpg
===Caption===
संशयित आरोपीसमवेत पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पथक.