नाशिक : पोलीस अधिकारपदाचे स्वप्न पाहून कायदा व सुव्यवस्थेचे तब्बल ४५ वर्षांपूर्वी महाराष्टÑ पोलीस अकादमीत धडे घेतलेल्या व सध्या सेवानिवृत्तीचे आयुष्य जगणाऱ्या ४५ पोलीस अधिकाऱ्यांनी एकत्र येत मेळावा भरवला. त्यात जुन्या आठवणींना उजाळा देण्याबरोबरच एकमेकांची सुख-दु:ख जाणून घेण्यात आले. दिवसभर चाललेल्या या मेळाव्याच्या समारोपप्रसंगी सर्व अधिकाºयांनी पोलीस अकादमीत भेट देऊन त्याविषयीची कृतज्ञताही व्यक्त केली.पोलीस दलात १९७३-७५ या काळात प्रशिक्षण घेऊन तब्बल तीस वर्षांहून अधिक काळ पोलीस निरीक्षक ते पोलीस अधीक्षकपदापर्यंत पोहोचलेले सेवानिवृत्त अधिकारी आता राज्यातील विविध भागांत सेवानिवृत्तीचे आयुष्य जगत असताना त्यांच्या विद्यमान परिस्थितीविषयी जाणून घेण्याच्या दृष्टीने नाशिकचे अनिल देशमुख, राजा तांबट, पांंडुरंग निफाडे, सुभाष पगारे, माणिकराव बेलदार, रमेश तायडे, केशवराव गायकवाड यांनी याकामी पुढाकार घेऊन प्रत्येकाशी संपर्क साधला. दोन दिवस चाललेल्या या मेळाव्यासाठी महाराष्टÑातील विविध भागातून ४५ अधिकाºयांनी हजेरी लावली. यात प्रत्येकाने आपली ओळख करून देतानाच, पोलीस खात्यात केलेली सेवा, आलेले अनुभव, कौटुंबिक परिस्थिती कथन करून एकमेकांची सुख-दु:खे जाणून घेतली.अकादमीच्या संचालकांची घेतली भेटया सर्व अधिकाºयांनी पोलीस अकादमीला भेट देऊन अकादमीचे संचालक संजय मोहिते यांची भेट घेतली व अकादमीची विद्यमान परिस्थितीची माहिती घेतली. मेळाव्याच्या समारोपाला नाशिककर अधिकाºयांच्या वतीने प्रत्येकाला विशेष स्मृतिचिन्ह देण्यात आले व पुढील मेळावा बारामती व कोल्हापूर येथे घेण्याचे ठरवून प्रत्येकाने निरोप घेतला.
अकादमीच्या माजी पोलीस अधिकाऱ्यांचा भरला मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:31 PM