विभागीय महसूल उपायुक्त प्रवीणकुमार देवरे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आगर टाकळी शिवार सर्व्हे नं.३१/२ प्लॉट नं.१७ या जागेवर गेल्या २० वर्षांपासून संजय गांधींचा पुतळा आहे. समाजकल्याण विभागाने ही जागा सोसायटीला हस्तांतरित केली, नंतर ती बिल्डरला देण्यात आली. त्याच्या आधीपासून हा पुतळा असून, या वसाहतीस ‘संजय गांधीनगर’ असे नाव देण्यात आले. पुतळ्याभोवती गाजरगवत, घाणीचे साम्राज्य वाढले असून, विजेची सोय नसल्याने रात्री अंधार असतो. ऊन-वारा-पाऊस, धुळीमुळे पुतळ्याचा रंग उडाला आहे. पुतळ्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर शहराध्यक्ष गणेश पवार, प्रवीण साळुंके, चेतन पाटील, विजय खलाटे, सौरभ पवार, विशाल घाडगे, अनिकेत कपोते, गणेश खुटे, स्वप्निल सोनवणे, प्रफुल आपटे आदींच्या सह्या आहेत.
(फोटो ०९ पुतळा)