सटाणा : बागलाणला कायमस्वरूपी तहसीलदार मिळावा म्हणून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे पदाधिकाºयांची मागणी अद्यापही पूर्ण न झाल्याने मनसे पदाधिकाºयांनी सोमवारी (दि.९) नाशिक येथील महसूल आयुक्तालय गाठले. सहा दिवसांत बागलाणला कायमस्वरूपी तहसीलदार द्या अन्यथा नागपूर येथील विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा मनसे पदाधिकाºयांनी दिला आहे.बागलाणला गेल्या आठ महिन्यांपासून पूर्णवेळ तहसीलदार नसल्याने नागरिकांची अनेक शासकीय कामे रेंगाळली आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना शालेय कामकाजासाठी दाखलेदेखील वेळेवर उपलब्ध होत नसल्याने पूर्णवेळ तहसीलदाराची नेमणूक करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी गत सहा महिन्यांपासून प्रयत्नशील आहेत. वारंवार लेखी निवेदन देऊन, तहसील कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न आणि अखेर आत्मदहनाचा प्रयत्न करूनही आश्वासनांपलीकडे काहीही मिळत नसल्याने मनसे पदाधिकाºयांनी थेट नाशिक विभागीय महसूल आयुक्तालय गाठत कायमस्वरूपी तहसीलदारांची मागणी केली आहे. यावेळी महसूल उपायुक्त स्वामी यांनी दोन दिवसांत कायमस्वरूपी तहसीलदार नेमणूक करण्याचे आश्वासन दिले आहे.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मनोज सोनवणे, तालुकाध्यक्ष सतीश विसपुते, शहराध्यक्ष पंकज सोनवणे, वैभव सोनवणे, शहर सरचिटणीस मंगेश भामरे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हर्षवर्धन सोनवणे, मनसे उपशहर अध्यक्ष निलेश नंदाळे, उपशहर अध्यक्ष हेमंत इंगळे, उपतालुकाध्यक्ष विश्वास खैरनार उपस्थित होते. मनसे पदाधिकाºयांनी सुरु वातीला कायमस्वरूपी तहसीलदार मिळावा या मागणीसाठी वरिष्ठ अधिकाºयांना निवेदन दिले. त्यानंतरही दखल घेतली गेली नाही. तहसील कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीदेखील लवकरच कायमस्वरूपी तहसीलदार नेमण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र पूर्णवेळ तहसीलदार न मिळाल्याने मनसे पदाधिकाºयांनी गेल्या आठवड्यात तहसील आवारात थेट आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मागणी मान्य न झाल्याने विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली.
पूर्णवेळ तहसीलदारासाठी आयुक्तांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 1:28 AM