सुरगाणा : तौक्ते चक्रीवादळामुळे सुरगाणा तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांमध्ये आमदार नितीन पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत पहाणी दौरा करून करून तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली.यावेळी आमदार पवार यांनी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या घरांचे तसेच आंबा, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्या सर्वांना तत्काळ पंचनामे करुन शासन स्तरावरून आर्थिक मदत देण्याबाबत प्रशासकीय यंत्रणेस सुचना केल्या.सुकतळे, हस्ते, सांबरखल, बरडा, दाबाडमाळ, रोंगाणे, म्हैसमाळ, शिरीषपाडा,दांडीचीबारी, वडपाडा, माणी, खडकमाळ, पळसन, म्हैसखडक, देविपाडा, उंबरठाण, मांधा पांगारणे, गोंदूणे आदी गावांमध्ये भेट दिली.या दौ-यात विशेषत: आदिवासी बहुल ग्रामीण भागातील आदिवासी नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेत नसुन लसीकरणाबाबत काही गैरसमज पसरल्याने आमदार पवार यांनी सर्व आदिवासी बांधवांना लसीकरणाचे महत्व पटवुन सांगितले. मी स्वतः लस घेतली आहे. माझ्या सोबत या सर्व अधिकारींनी, पत्रकारांनी देखील लस टोचून घेतली असून तुमच्या समोर सर्वजण जिवंत उभे आहेत. अशी भावनिक साद देखील घातली.या नुकसान ग्रस्त पाहणी दौ-याचे विशेष आकर्षण म्हणजे नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करतेवेळी आमदार पवार यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण बाबत जनजागृती करतेवेळी अनोखी शक्कल लढवत सुरगाणा तालुक्यातील जी ग्रामपंचायत शासनाच्या पात्रता निकषानुसार शंभर टक्के लसीकरण करणार, त्या ग्रामपंचायत हद्दीत विकास कामांसाठी अतिरिक्त १५ लाख निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले.खडकमाळ येथे दोन साठवण बंधारे तसेच वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवण्याची मागणी केली. इतरही ठिकाणी विहीर, पाणी टंचाई, वीज, आंबा पीक, घरांचे नुकसान, माणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील जलपरीची दोन वेळा झालेली चोरी व त्यामुळे उद्भवलेली पाणी समस्या आमदार पवार यांनी जाणून घेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उपस्थित अधिकारींना सुचना दिल्या.याप्रसंगी तहसीलदार किशोर मराठे, गटविकास अधिकारी पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रणवीर, तालुका कृषी अधिकारी रहाणे तसेच युवा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार, प्रमुख पदाधिकारी व नुकसान ग्रस्त भागातील स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
शंभर टक्के लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायतींना १५ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 3:51 PM
सुरगाणा : तौक्ते चक्रीवादळामुळे सुरगाणा तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांमध्ये आमदार नितीन पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत पहाणी दौरा करून करून तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली.
ठळक मुद्देआमदार नितीन पवार : नुकसान झालेल्या गावांचा पहाणी दौरा