--------------------------
पडळकरांवरील हल्ल्याचा निषेध
सिन्नर : धनगर समाजाचे नेते व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी होऊन हल्लेखोरांची त्वरित चौकशी होण्याची मागणी सिन्नर तालुका भाजपच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, जयंत आव्हाड, सुभाष कर्पे, सविता कोठूरकर, मनोज शिरसाठ, राजेश कपूर, महेश गुजराथी, रूपाली काळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.
--------------------------------
उपनगरातील रस्त्यांची दुरवस्था
सिन्नर : शहरानजीक असलेल्या विजयनगर, कानडी मळा या भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, त्याची दुरुस्ती करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. विजयनगर, कानडीमळ्यासह गणेशनगर, एकतानगर, टेलिफोन ऑफिससमोर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. निवेदनावर प्रहारचे कैलास दातीर, राहुल कटारनवरे, खंडेराव सांगळे, कपिल कोठूरकर, चंद्रकांत डावरे, सागर लोंढे यांच्यासह कार्यकर्त्यांची नावे आहेत.
--------------------
पाडळीत कोरोनायोद्ध्यांचा सत्कार
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर विद्यालयात डॉक्टर्स डेनिमित्त कोरोनायोद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. ठाणगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र धादवड, डॉ. भाग्यश्री परदेशी, डॉ. सुचित्रा काळे, आरोग्यसेविका सुरेखा गिरी, सुनीता भागवत यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांचा मुख्याध्यापक एस. बी. देशमुख व शिक्षकांच्या हस्ते कोरोनायोद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.