शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

भूसंपादनासाठी निधीची चणचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 1:08 AM

आरक्षित जागा संपादित करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात अंदाजपत्रकात केलेली तरतूद संपली असून, मिळकत विभागाकडे निधीअभावी सुमारे अडीचशे प्रस्ताव प्रलंबित आहेत. याशिवाय, आरक्षण वगळण्यासाठी कलम १२७ नुसार महापालिकेकडे १७३ नोटिसा प्राप्त झाल्या आहेत. सुधारित अंदाजपत्रकात तरतूद वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार असला तरी, भूसंपादनाकरिता मोठ्या प्रमाणावर निधीची चणचण भासणार आहे.

नाशिक : आरक्षित जागा संपादित करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात अंदाजपत्रकात केलेली तरतूद संपली असून, मिळकत विभागाकडे निधीअभावी सुमारे अडीचशे प्रस्ताव प्रलंबित आहेत. याशिवाय, आरक्षण वगळण्यासाठी कलम १२७ नुसार महापालिकेकडे १७३ नोटिसा प्राप्त झाल्या आहेत. सुधारित अंदाजपत्रकात तरतूद वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार असला तरी, भूसंपादनाकरिता मोठ्या प्रमाणावर निधीची चणचण भासणार आहे.  आरक्षित केलेल्या जागा संपादनाची प्रक्रिया महापालिकेच्या मिळकत विभागामार्फत राबविली जाते. दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी होऊनही महापालिकेने आरक्षित जागा ताब्यात न घेतल्यास संबंधित जागा मालकाला कलम १२७ नुसार पुन्हा आपल्या जागेवर हक्क सांगता येतो. त्यानुसार, महापालिकेकडे सद्यस्थितीत कलम १२७ नुसार १७३ नोटिसा प्राप्त झाल्या आहेत. महापालिकेमार्फत दरवर्षी अंदाजपत्रकात भूसंपादनाकरिता तरतूद केली जात असते. डॉ. प्रवीण गेडाम यांच्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत सुमारे १२५ कोटी रुपयांची तरतूद भूसंपादनासाठी करण्यात आली होती. आता महापालिकेची एकूणच हलाखीची आर्थिक परिस्थिती पाहता सन २०१७-१८ या अंदाजपत्रकात आयुक्तांनी ९५.१४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, सदर तरतूद आठ महिन्यांतच संपली आहे. आयुक्तांच्या अंदाजपत्रकात महासभेने भूसंपादनासाठी केवळ चार कोटी रुपयांची भर घातलेली आहे. आयुक्तांची तरतूद संपली असल्याने लेखा विभागाला आता महासभेची तरतूद वापरण्यासाठी मान्यता घ्यावी लागणार आहे. परंतु, सदर रक्कम अगदीच तुटपुंजी असल्याने सुधारित अंदाजपत्रकात भूसंपादनाकरिता वाढीव रक्कम धरताना आयुक्तांची कसोटी लागणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून महापालिकेच्या सुधारित अंदाजपत्रकाची तयारी सुरू होणार आहे. महापालिकेच्या मिळकत विभागाकडे भूसंपादनाचे सुमारे २५० प्रस्ताव पडून आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी लागणार आहे. मुदतीत जागा संपादन न केल्यास आरक्षण व्यपगत होण्याची भीती आहे. निधीच उपलब्ध नसल्याने मिळकत विभागाकडूनही स्थायीवर प्रस्ताव पाठविताना सावधगिरी बाळगली जाताना दिसून येत आहे. स्पीलओव्हर ८०० कोटींवर महापालिकेचे चालू आर्थिक वर्षात दायित्व (स्पीलओव्हर) ८०० कोटी रुपयांच्या आसपास जाऊन पोहोचले आहे. महासभेने २५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकासाचा ठराव केल्याने महापालिकेच्या ईआरपी प्रणालीत त्याचा समावेश झालेला आहे. त्यामुळे स्पीलओव्हरचा फुगवटा दिसून येत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, सदर रस्त्यांसाठी चालू आर्थिक वर्षात निधीची तरतूद होणे शक्य नसल्याचेही सांगितले जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका