नाशिक : कोरोनाविरुद्ध प्रशासनाची लढाई सुरू असताना निधीची तसेच यंत्रसामुग्रीची आवश्यकता निर्माण झाल्यानंतर आमदारांनी आपला निधी देऊ केला आहे. जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आरोग्य विभागासाठी आपल्या निधीचा विनियोग करून कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपला सहभाग नोंदविला.कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्थानिक पातळीवरील उपाययोजनांवर भर दिला जात आहे. सामाजिक संस्थांच्या मदतीने जिल्हा प्रशासन कोरोनाशी लढत आहे. स्थानिक नागरिकांना सुरक्षितता आणि कोरोनाचे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेच शिवाय लोकप्रतिनिधींचीदेखील मदत घेतली जात आहे. लोकप्रतिनिधीदेखील या लढ्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपले योगदान देत असून, आजवर जिल्ह्यात ५ कोटी ८ लाख ९४ हजार इतका खर्च केला आहे. शहर, जिल्ह्यात आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या उपचाराबरोबरच आरोग्य यंत्रणेच्या सुरक्षिततेसाठीदेखील आमदारांनी आपला निधी वापरला आहे. पीपीई किट, सॅनिटायझर, रुग्णालय परिसराचे सॅनिटायझेशन, व्हेंटिलेटर तसेच आॅक्सिजन किटसाठी निधीचा वापर आवश्यकतेनुसार करण्यात आलेला आहे.कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शासनाच्या निधीला मर्यादा आल्याने तातडीची आवश्यकता म्हणून आमदारांनी आपला निधी कोरोनासाठी देऊ केलेला आहे.केंद्र शासनाच्या आदेशाने खासदारांनी सुमारे एक कोटींचा निधी जिल्हा आरोग्य यंत्रणेसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. हा निधी परस्पर आरोग्य यंत्रणेत वळता करण्यात आलेला आहे.
कोरोनासाठी आमदारांनी दिला निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:11 AM
कोरोनाविरुद्ध प्रशासनाची लढाई सुरू असताना निधीची तसेच यंत्रसामुग्रीची आवश्यकता निर्माण झाल्यानंतर आमदारांनी आपला निधी देऊ केला आहे. जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आरोग्य विभागासाठी आपल्या निधीचा विनियोग करून कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपला सहभाग नोंदविला.
ठळक मुद्देपाच कोटी रुपयांचा खर्च : आरोग्य विभागासाठी सर्वाधिक नियोजन