सिन्नर : तालुक्यातील १४ रस्त्यांसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच या कामांना प्रारंभ होणार आहे.सिन्नर विधानसभा मतदारसंघात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०१६-१७ इतर जिल्हा रस्ते विकास या लेखाशीर्षकांतर्गत आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पाठपुराव्याने दोन कोटी ४७ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. मानोरी, हरसुले, पंचाळे, सोनारी, पाथरे, बेलू, चिंचोली, वडगाव-पिंगळा, मनेगाव, पाटोळे, भोकणी, तामकडवाडी, खडांगळी या गावांना या कामाचा फायदा होणार आहे.मानोरी ते जुना निमोण रस्ता (२० लाख), हरसुले ते सोनांबे रस्ता सुधारणा करणे (४० लाख), पंचाळे ते दहीवाडी रस्ता सुधारणा करणे (२५ लाख), सोनारी जोड रस्ता सुधारणा करणे (१२ लाख), पाथरे ते तालुका हद्द जवळके रस्ता सुधारणा करणे (२० लाख), बेलू येथे महामार्ग ते बेलू गाव १ किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे (१५ लाख), चिंचोली फाटा ते मोह १ किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे (१५ लाख), कारखाना गेट ते वडागाव पिंगळा रस्ता सुधारणा करणे (१५ लाख), राज्य मार्ग ५० ते मनेगाव रस्ता सुधारणा करणे (१५ लाख), पाटोळे ते खताळवस्ती ते धुळवड रस्ता सुधारणा करणे १५ लाख), भोकणी फाटा ते सुरेगाव रस्ता सुधारणा (१५ लाख), हिवरे ते तामकडवाडी रस्ता सुधारणा (१५ लाख), खडांगळी ते उजनी दीड किलोमीटर रस्ता सुधारणा करणे (१५ लाख) व चिंचोली ते नाशिक साखर कारखाना रस्ता सुधारणा करणे (१० लाख). या १४ रस्त्यांच्या सुधारणा करण्यासाठी सदर निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार वाजे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. (वार्ताहर)
सिन्नर तालुक्यात १४ रस्त्यांसाठी निधी
By admin | Published: October 15, 2016 12:12 AM