नागरी सुविधा योजनेंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधा विशेष अनुदान योजना याद्वारे दापूर येथे गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दापूर गाव धूळमुक्तीकडे वाटचाल करत आहे. यापूर्वीही अंतर्गत रस्त्यांचे बंदिस्त गटारीसह कामे झाली आहेत. ग्रामपंचायत, दवाखाना, अभ्यासिका परिसर विकसित करण्यात आला आहे. ग्रामीण तीर्थक्षेत्र योजनेंतर्गत ग्रामीण विभागातील तीर्थक्षेत्र विकासासाठी नळवाडी येथे गंगाश्रम परिसर विकासासाठी आठ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी पाच लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यासाठी पाठपुरावा सुरू होता. कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, ती लवकरात लवकर पूर्ण केले जातील, अशी माहिती सांगळे यांनी दिली. नळवाडी येथे पाताळेश्वर मंदिराला सभामंडप देण्यात आला होता. तो पूर्णत्वास गेला आहे. त्यामुळे नळवाडी येथील तीर्थक्षेत्र विकासाची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
दापूर व नळवाडीला विकासकामांसाठी निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 4:10 AM