जनसुविधा योजनेंतर्गत काष्टी, जळगाव ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी २४ लाख मंजूर करण्यात आले आहेत. सावतावाडी, सायने खु., वडेल, वाके, वळवाडी, अजंग, आघार खु., दाभाडी, दहिकुटे, दसाणे, गाळणे, काष्टी, कौळाणे गा., लोणवाडे, लुल्ले, नांदगाव, निळगव्हाण, साजवहाळ, सवंदगाव या गावांतील स्मशानभूमी व इतर कामांसाठी १ कोटी १२ लाख मंजूर करण्यात आले आहेत. नागरी सुविधा योजनेंतर्गत झोडगे, अजंग, वडेल, करंजगव्हाण, रावळगाव, सौंदाणे गावांसाठी गावांतर्गत रस्ते काँक्रिटीकरणासाठी ५५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत वडनेर खा. महादेव मंदिर येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, पिंपळगाव येथील गंगासागर मंदिरापर्यंत जाण्यासाठी पोहोच रस्ता तयार करणे, करंजगव्हाण येथील विंध्यवासिनी देवी मंदिर येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, आघार येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरातील सुधारणा कामांसाठी एकूण ३२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींच्या विकासासाठी कौळाणे गा., वळवाडी, राजमाने, दसाणे, गाळणे, करंजगव्हाण, पळासदरे, पिंपळगाव, माणके, लोणवाडे, वडनेर, कोठरे बु., सायने खु., दुंधे, घाणेगाव, सातमाने, निळगव्हाण, वडेल, झोडगे, टेहरे, डाबली, तळवाडे, गारेगाव, विराणे, मुंगसे, लुल्ले, चिंचवे, हाताणे, वडगाव, लेंडाणे, कोठरे खु., निमशेवडी, रावळगाव, दाभाडी, कजवाडे, कंक्राळे, डोंगराळे, चंदनपुरी, भिलकोट आदी गावांमध्ये पाणीपुरवठा, गावांतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, भूमिगत गटार करणे, सौरपथदीप बसविणे, हायमास्ट बसविणे, शौचालय बांधकाम करणे, एल.ई.डी. स्ट्रीट लाइट या कामांसाठी ५ कोटी ४२ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचेही भुसे यांनी सांगितले.
१८ गावांमधील स्मशानभूमी कामांसाठी निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 4:06 AM