सटाणा : बागलाण व मालेगाव तालुक्यातील गावांना जिल्हा नियोजन विभागांच्या माध्यमातून जनसुविधा योजनेंतर्गत सुमारे ३ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी माहिती दिली.डॉ. भामरे यांनी सांगितले की, बागलाण व मालेगाव तालुक्यात गेल्या साडेचार वर्षात केंद्रीय व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहेत. आगामी काळात मनमाड- इंदूर रेल्वेमार्ग, कसमादे पट्ट्यास वरदान ठरणारी नार-पार योजना, सटाणा व नामपूर शहरासाठी अनुक्रमे पुनद व हरणबारी धरणातून थेट पाइपलाइनद्वारा पिण्याचा पाणीपुरवठा करणे आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करणार आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासूनचा रस्ता कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बागलाण तालुक्यातून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त करून साक्र ी ते शिर्डी हा नवा मार्ग तयार होणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी निविदा प्रक्रि या पूर्ण झाली असून काम हाती घेण्यात येणार आहे.बागलाण व मालेगाव तालुक्यात संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले, जनसुविधा योजनेतून कोटबेल, मानूर, वाडीपिसोळ, डोंगरेज, साल्हेर, आसखेडा, निकवेल येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी प्रत्येकी १२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. आखतवाडे येथील स्मशानभूमीत पेवरब्लॉक बसविणे १५ लाख रुपये, दसाणे स्मशानभूमीसाठी १० लाख रुपये तसेच स्मशानभूमी अनुषंगाने करावयाच्या कामांसाठी विंचुरे, औंदाणे, वनोली, आनंदपूर, ब्राह्मणपाडे, बिजोटे, टेंभे खालचे, वीरगाव, ब्राह्मणगाव आदी गावांसाठी प्रत्येकी ९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पिंपळकोठे, चौंधाणे, तरसाळी, जाखोड, नरकोळ, मुंगसेपाडा, आव्हाटी, केरसाणे, कंधाणे, डांगसौंदाणे, तांदूळवाडी, नांदीन, मळगाव, जुनी शेमळी, ठेंगोडा, मोरेनगर, परशुरामनगर, किकवारी, तळवाडे दिगर, धांद्री, वायगाव, मुंगसे, दहिंदुले, लखमापूर आदी गावांतील स्मशानभूमीच्या कामांसाठी प्रत्येकी ५ लाख रुपये मिळणार आहेत.
मालेगाव, बागलाणसाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 6:34 PM